IPL 2022 Marathi News : गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यामध्ये आयपीएल 2022 मध्ये 43 वा सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव केला. गुजरातकडून राहुल तेवातियाने मॅच विनिंग खेळी केली. तेवातियाने अखेरच्या तीन षटकात सामना फिरवला. राहुल तेवातियाला सामनाविर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामन्यानंतर आरसीबीचा विराट कोहली आणि राहुल तेवातिया यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ट्रोलर्सही विराट कोहलीला ट्रोल केल आहे.
आरसीबीविरोधात राहुल तेवातियाने 25 चेंडूत नाबाद 43 धावांची खेळी केली. राहुल तेवातियाच्या या विस्फोटक खेळीच्या बळावर गुजरातने आरसीबीचा सहा गड्याने पराभव केला. या सामन्यानंतर राहुल तेवातिया आणि विराट कोहली यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोमध्ये विराट कोहली खुर्चीवर बसलेला दिसत आहे. तर राहुल तेवातिया विराटसमोर गुडघ्यावर टेकून बोलत आहे. गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलाय. गुजरातने फोटोला कॅप्सनमध्ये लिहिलेय की, प्लेअर ऑफ दी मॅच आहेच, पण आपला राहुल भाई फॅन बॉय ऑफ द डे पण आहे...
या फोटोवर नेटकऱ्यांनी माजी कर्णधार विराट कोहलीवर टीकास्त्र सोडले. विराट कोहलीचा फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. त्यात आता या फोटोवरुनही लोकांनी विराटला ट्रोल केलेय. विराट कोहली राहुल तेवातियाकडून टिप्स घेत आहे, अशा कमेंट केल्या जात आहे...
पाहा फोटो
मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) सुरु असलेल्या आयपीएल2022 च्या 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore) 6 विकेट्सनं पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरूच्या संघानं 20 षटकात 6 विकेटस् गमावून धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 6 विकेट्स राखून हा सामना जिंकला. गुजरातच्या विजयात अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि डेव्हिड मिलरनं (David Miller) महत्वाची भूमिका बजावली.