Rassie van der Dussen Jos Buttler Rajasthan Royals IPL 2022 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअवर रॉयल्सची लढत सुरु आहे. आरसीबी आणि राजस्थान यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये धडक मारणार आहे. या सामन्यादरम्यान एक अतरंगी बातमी समोर आली आहे.  राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रस्सी वॅन डेर डसनची पत्नी लाराने जोस बटलरला दुसरा पती असल्याचे सांगितलेय.  लारा आणि बटलर यांची ही बातमी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.  लाराने मस्करीत जोस बटलर माझा दुसरा पती असल्याचे म्हटलेय. राजस्थानचा जोस बटलर यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. रस्सी वॅन डेर डसनची पत्नी लारा प्रत्येक सामना पाहण्यासाठी मैदानात असते. 


 रस्सी वॅन डेर डसनची पत्नी लाराने मस्करीत जोस बटलरला आपला दुसरा पती म्हणून स्विकारलेय. त्याचे कारणही लाराने सांगितलेय. कारण, जेव्हा जेव्हा बटलर षटकार लगावतो तेव्हा तेव्हा कॅमेरा माझ्याकडे आलेला आसतो. त्यामुळे सोशल मीडियावर आणि लोकांना मी बटलरची बायको असल्याचे वाटतेय. पण मी रस्सी वॅन डेर डसनची पत्नी असल्याचे लाराने सांगितले. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार, बटलर जेव्हा जेव्हा चौकार-षटकार मारतो, तेव्हा तेव्हा कॅमेरामन लाराला फोकस करतो.  


दक्षिण अफ्रीकाचा विस्फोटक फलंदाज रस्सी वॅन डेर डसनची पत्नी लाराने नुकताच राजस्थान रॉयल्सच्या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये लारा म्हणाली की,  ''मला वाटतेय की मी बटलरला दुसऱ्या पतीच्या रुपाने स्विकारलेय. मला बटलरची पत्नी लुईसच्या नावाने लोक ओळखतात. पण मी लुईस नाही.. अन् बटलरची पत्नीही नाही.. पण वारंवांर माझ्याकडे कॅमेरा येत असल्यामुळे लोकांना मी बटलरची पत्नी असल्याचे वाटतेय. ''  


कुणाचं पारडं जड? -
आयपीएलच्या इतिहासाचा विचार करता आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 27 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानना 11 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत देखील सुटले आहेत. 



कसा आहे पिच रिपोर्ट? -
आजचा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी मैदानात पार पडणार आहे. अहमदाबादचं वातावरण पाहता याठिकाणी उष्णता अधिक असू शकते. सायंकाळी 29 अंश सेल्सियस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता असूनही खेळपट्टी पाहता चेंडूला बाऊन्स मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे गोलंदाजांना अधिक फायदा होऊ शकतो. त्यात सामनाही सायंकाळी आहे अशामध्ये दवाची अडचणही येऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकून संघ गोलंदाजी आधी घेण्याची अधिक शक्यता आहे.