Dinesh Karthik Yuzvendra Chahal RR vs RCB Qualifier 2 IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या यंदाच्या हंगामात नव्याने सामिल झालेल्या गुजरातने अगदी दमदार कामगिरी करत सर्वात आधी अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. ज्यानंतर आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) या संघातील सामन्यात विजेता होणारा संघ अंतिम सामन्यात पोहोचणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आयपीएलचा खिताॉब जिंकण्याचं स्वप्न इथेच संपणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त नक्कीच करतील. आज होणाऱ्या रॉयल लढतीमध्ये दिनेश कार्तिक आणि युजवेंद्र चहल यांच्यातील टक्कर पाहण्यासारखी असणार आहे.
चहल आणि कार्तिक यांच्यातील मैदानावरील सामना रोमांचक राहिलाय. यामध्ये आतापर्यंत चहलचे पारडे जड असल्याचे दिसतेय. रिकॉर्ड्सवर नजर टाकल्यास चहलपुढे कार्तिक हातबल असल्याचे दिसतेय. चहलने दहा डावात तीन वेळा तंबूत धाडलये. चहलविरोधात कार्तिकची सरासरी 12.66 इतकीच राहिलेय. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये हा मुकाबला पाहण्यासारखा होणार आहे. कारण, कार्तिक आणि चहल तुफान फॉर्मात आहेत.
आयपीएल 2022 मध्ये चहलने दमदार कामगिरी केली आहे. चहलने 15 सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. पर्पल कॅप सध्या चहलकडेच आहे. यंदाच्या हंगामात दिनेश कार्तिकचीही कामगिरी चांगली राहिली आहे. कार्तिकने फिनिशरची भूमिका योग्य प्रकारने निभावली आहे. 15 सामन्यात कार्तिकने 10 वेळा नाबाद राहात 324 धावांचा पाऊस पाडलाय. आरसीबीकडून सर्वाधिक षटकारही कार्किकच्याच नावावर आहेत.
हे देखील वाचा-
- RR vs RCB : आज राजस्थानविरुद्ध विजयासाठी बंगळुरुचे कोण 'सुपर-5' मदत करणार?
- IPL 2022 : 'सुपर-5' राजस्थानला मिळवून देणार फायनलचं तिकीट?
- Rajat Patidar : बंगळुरुला सामना जिंकवणारा रजत आधी होणार होता गोलंदाज, 'या' कारणामुळे बदलला निर्णय
- IPL 2022 Final : फायनलची जंगी तयारी, 6000 पोलीस तैनात, पंतप्रधान मोदींसह अमित शाह राहणार उपस्थित