IPL 2022 final Match : आयपीएलचा 2022 (IPL 2022) स्पर्धा आता जवळपास संपत आली आहे. आज क्वॉलीफायर 2 सामना राजस्थान आणि बंगळुरु संघात होणार असून विजेता संघ गुजराविरुद्ध फायलन खेळेल. 29 मे रोजी हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दरम्यान यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आयपीएलची सांगता जंगी होणार आहे. त्यामुळे 29 मे रोजी अनेक मान्यवर येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे याठिकाणी तब्बल 6 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.


या सामन्यापूर्वी सांगता कार्यक्रम असणार असून यावेळी सामना इतर सामन्यांच्या तुलनेत अर्धा तास उशीरा सुरु होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, रात्री  8 वाजता अंतिम सामना होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल... सध्या साडेसात वाजता आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होते, तर सात वाजता नाणेफेक होते. दरम्यान यामुळे आयपीएल फायनलपूर्वी एक मनोरंजनाचा कार्यक्रमही सर्वांना पाहायला मिळेल.


IPL 2022 चा दिमाखात समारोप 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम आयोजत करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. आयपीएलचा क्लोजिंग समारोप 29 मे रोजी सायंकाळी साडेसाहा वाजता सुरु होणार आहे. हा कार्यक्रम 50 मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता... पण आज झालेल्या बैठकीत समारोप कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.  


पुढील हंगामापासून वेळेत बदल - 
बुधवारी बीसीसीआयने आयपीएल 2023 बाबात मोठी घोषणा केली होती. क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, संभावित ब्रॉडकास्टरला सामना सायंकाळी आठ वाजता सुरु होणार असल्याचे सांगितलेय. तर दुपारचा सामना सांयकाळी चार वाजता सुरु होणार असल्याचे सांगण्यात आलेय. तसेच 16 व्या हंगामात डबल हेडर सामने कमी असतील, याचा विचार करण्यात येणार आहे.  


हे देखील वाचा-