IPL 2023 GT vs RR Playing 11 : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 48 व्या सामन्यात आज जयपूरमधील मैदानावर गुजरात (GT) आणि राजस्थान (RR) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasathan Royals) संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर तर गुजरात टायटन्स (Gujrat Titans) पहिल्या क्रमांकावर आहे. शेवटच्या सामन्यात राजस्थान संघाचा मुंबईने तर, गुजरात संघाचा दिल्लीने पराभव केला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजच्या सामन्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उतरणार आहेत. 


RR vs GT, IPL 2023 Match 48 : राजस्थान विरुद्ध गुजरात


जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना रंगणार आहे. या हंगामात दोन्ही संघांनी प्रभावी कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी सहा सामने जिंकले आहेत. सलग तीन सामने जिंकल्यानंतर गुजरात संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा त्यांचा मागील सामना गमावला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने यंदाच्या हंगामात नऊ पैकी पाच सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्धचा शेवटचा सामना राजस्थानने गमावला.




IPL 2023 GT vs RR : गुजरात पराभवाचा बदला घेणार?


आयपीएल 2023 मध्ये शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आज राजस्थान रॉयल्स विरोधात मैदानात उतरणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल. यामध्ये राजस्थान संघाचं पार थोडं जड आहे. दोन्ही संघांमध्ये यंदाच्या मोसमात एक सामना खेळला गेला होता. आयपीएल 2023स मधील 23 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने तीन गडी राखून विजय मिळवला होता.




GT vs RR Probable Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11


RR Probable Playing 11 : राजस्थान रॉयल्स 


यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हिटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), डीसी जुरेल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.


GT Probable Playing 11 : गुजरात टायटन्स 


शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद


महत्त्वाच्या इतर बातम्या :


RR vs GT Match Preview : राजस्थान आणि गुजरात आमने-सामने, कुणाचं पारड जड; हेड टु हेड आकडेवारी काय सांगते?