RR vs GT Match Prediction : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 48 व्या सामन्यात गुजरात (GT) आणि राजस्थान (RR) दोन संघ आमने-सामने येणार आहेत. गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील ही लढत राजस्थानच्या घरच्या मैदानावर पार पडणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर (Sawai Mansingh Indoor Stadium) 7.30 वाजता ही लढत पाहायला मिळणार आहे.


IPL 2023 GT vs RR Match 48 : राजस्थान आणि गुजरात आमने-सामने


गजविजेता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील ही लढत पार रंजक ठरणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत टॉप 4 मध्ये पाय रोखून आहेत. सध्या गुजरात संघ पॉईंट्स टेबलसध्ये पहिल्या स्थानावर तर, राजस्थान चौथ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. गुजरात संघाला मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे मागील सामन्यात राजस्थान संघाला मुंबई इंडियन्सने मात दिली होती. आज गुजरात आणि राजस्थान पराभवाचा बदला घेऊन विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. 


GT vs RR Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा 


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या दोन संघात आतापर्यंत 4 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड आहे. गुजरात संघाने चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, राजस्थान संघाला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 180 आहे.


RR vs GT IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आज, 05 मे रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर (Sawai Mansingh Indoor Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Points Table : कोलकाताचा हैदराबादवर पाच धावांनी विजय, गुणतालिकेत तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर? पाहा