IPL 2023 Points Table : आयपीएलच्या (IPL 2023) 47 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) त्यांच्या घरच्या मैदानावर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कोलकाताकडून (Kolkata Knight Riders) पराभवाला सामोरे जावं लागलं. हैदराबादला (SRH) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पाच धावांनी पराभूत केलं. कोलकाताचा (Kolkata Knight Riders) कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता संघाने 20 षटकांत नऊ गडी गमावून 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स (Sunrisers Hyderabad) संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 166 धावाच करू शकला. हा सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघाच्या गुणतालिकेतील स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. कोलकाता आठव्या आणि हैदराबाद नवव्या क्रमांकावर कायम आहे.






गुजरात संघ पहिल्या स्थानावर कायम


गुणतालिकेत पहिल्या स्थानावर गतविजेता गुजरात संघ आहे. गुजरात संघाने नऊपैकी सहा सामने जिंकले असून संघाकडे 12 गुण आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर लखनौ आहे. लखनौ संघाने 10 पैकी पाच सामने जिंकले असून संघाकडे 11 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघानेही 10 पैकी पाच सामने जिंकले असून संघाकडे 11 गुण आहेत. चौथ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थान संघाने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. 






गुणतालिकेत इतर संघांची परिस्थिती काय?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. बंगळुरुकडे 10 गुण असून संघाने नऊपैकी पाच सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. संघाने आतापर्यंतच्या नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. पंजाब संघ 10 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. तर, आठव्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता संघाकडे 10 गुण आहेत. कोलकाता संघाने दहा पैकी चार सामने जिंकले आहे. हैदराबाद संघ सहा गुणांसह नवव्या स्थानावर असून संघाने नऊपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत सर्वात शेवटी दिल्ली कॅपिटल्स असून संघाकडे सहा गुण आहेत. दिल्लीने आतापर्यंतच्या नऊपैकी फक्त तीन सामन्यांत विजय मिळवला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


टीम इंडियाला दुखापतीचा फटका,  कोण WTC फायनलमधून बाहेर तर काहींच्या खेळण्यावर सस्पेन्स