Royal Challengers Bangalore vs Punjab Kings :  निर्णायक सामन्यात पंजाबने आरसीबीचा तब्बल 54 धावांनी पराभव केला. लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॉने बेअरस्टो यांच्या वादळी अर्धशतकानंतर कगिसो रबाडाच्या भेदक माऱ्याच्या जोरावार पंजाबने आरसीबीवर मात केली. पंजाबने दिलेल्या 210 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ 20 षटकात 9 बाद 155 धावांपर्यंत मजल मारु शकला. पंजाबचा 12 सामन्यातील सहावा विजय ठरलाय. रबाडाच्या नेतृत्वातील पंजाबच्या गोलंदाजीपुढे आरसीबीची फंलदाजी ढासळली. 


पंजाबने दिलेल्या 210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांना चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली 20 धावांवर बाद झाला.. तर फाफ डु प्सेसिस 10 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर महिपाल सोमरोरलाही मोठी खेळी करता आली नाही. तो सहा धावा काढून माघारी परतला. मॅक्सवेल आणि रजत पाटीदार यांनी आरसीबीचा डाव सावरला.. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. पाटीदार 26 धावा काढून बाद झाला तर मॅक्सवेल 35 धावांवर बाद झाला. दिनेश कार्तिकलाही मोठी खेळी करता आली नाही. कार्तिक 11 धावा काढून बाद झाला. शाहबाद अहमद 9, हर्षल पटेल 11, हसरंगा 1 धावा काढून बाद झाले...मोहम्मद सिराज 9 आणि जोश हेजलवूड 7 धावा काढून नाबाद राहिलेत. 


पंजाबकडून कगिसो रबाडाने भेदक मारा केला. रबाडाने तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.. तर ऋशी धवन आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंह आणि हरप्रीत बार यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 


बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबच्या सलामीविरांनी फाफच्या मनुसुब्यावर पाणी फेरले. जॉने बेअरस्टो आणि शिखर धवन यांनी ताबडतोब सुरुवात दिली. पाच षटकांत पंजाबने 60 धावांचा डोंगर उभा केला होता. मॅक्सवेलने शिखर धवनला बाद करत जोडी फोडली. त्यानंतर भानुका राजपक्षे 1 धाव काढून माघारी परतला. एका बाजूला विकेट पडत असताना जॉनी बेअरस्टोची फटकेबाजी सुरुच होती. बेअरस्टोने 29 चेंडूत वादळी 66 धावांची खेळी केली. मयांक अग्रवाल याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. मयांक 19 धावांवर बाद झाला. जितेश शर्मा 9, हरप्रीत 7 आणि आर धवन7 झटपट बाद झाले. राहुल चाहरही दोन धावा काढून बाद झाला. बेअरस्टोनंतर अखेरला लियाम लिव्हिंगस्टोन याने वादळी फलंदाजी केली. लियामने 42 चेंडूत 70 धावांचा पाऊस पाडला. 


आरसीबीकडून हर्षल पटेल याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर हसरंगाने दोन विकेट घेतल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि शाहबाज यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.