Yuvraj Singh and Suresh Raina IPL 2022  : मुंबई इंडियन्सने गुरुवारी चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव केला. यासह चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची फलंदाजी ढासळली. मुंबईच्या भेदक माऱ्यापुढे चेन्नईचा संघ 100 धावाही करु शकला नाही. चेन्नईचा संपूर्ण संघ 97 धावांत तंबूत परतला. चेन्नईची दाणादाण उडाल्यानंतर भारताचा माजी खेळाडू युवराजने सुरेश रैनाची खिल्ली उडवली. 


नेमकं काय झाले?
चेन्नई आणि मुंबईचा सामना सुरु असताना युवराज सिंह आणि सुरेश रैना फुटसालमध्ये दुसरा सामना पाहत होते. या सामन्यात ब्राझिलच्या रोनाल्डोसह इतर दिग्गज खेळाडू होते. यावेळी युवराजला चेन्नई 97 वर ऑलआऊट झाल्याचे समजले. त्यानंर युवराजने इन्स्टाग्रामवर सुरेश रैनासोबत एक स्टोरी पोस्ट केली. यामध्ये युवराजने सुरेश रैनाला प्रश्न विचारला.. तुझा संघ 97 वर ऑलआऊट झाला... तू काही बोलू शकतो का? यावर सुरेश रैनानेही भन्नाट उत्तर दिले. त्या सामन्यात मी नव्हतो...रैनाच्या उत्तरानंतर दोन्ही माजी खेळाडू हसत राहिले... 


पाहा व्हिडीओ 






सामन्यात काय झाले?


डॅनिअल सॅम्सच्या भेदक माऱ्यानंतर तिलक वर्माच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा तिसरा विजय होय.. तर चेन्नईचा आठवा पराभव झालाय. या पराभवासह चेन्नईचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलेय. तिलक वर्माच्या 34 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने चेन्नईवर पाच गड्यांनी विजय मिळवलाय. चेन्नईने दिलेल्या 98 धावांच्या आव्हानाचा मुंबईने यशस्वी पाठलाग केला. मुंबईने 14.5 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या. डॅनिअल सॅम्स आणि तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचे शिल्पकार झाले. 


चेन्नईने दिलेल्या मापक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात ही खराब झाली. मुंबईचे सलामी फलंदाज झटपट माघारी गेले. चेन्नईप्रमाणे मुंबईच्या फलंदाजांची दैणा झाली. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. ईशान किशन 6, रोहित शर्मा 18, डॅनिअल सॅम्स 1, पदार्पण करणारा स्टब्स 0 यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. एकाबाजूला विकेट पडत असताना तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरला. तिलक वर्माने एकाकी झुंज देत मुंबईला तिसरा विजय मिळवून दिला. तिलक वर्माने नाबाद 34 धावांची खेळी केली. टीम डेविडने 16 धावांची छोटेखानी मॅचविनिंग खेळी केली. दोन्ही डावात मिळून फक्त 5 षटकार लगावले गेले. यामध्ये चेन्नईने तीन तर मुंबईने दोन षटकार मारलेत. चेन्नईकडून मुकेश चौधरी आणि समजीत सिंह यांनी पहिल्या 8 षटकात भेदक मारा केला. या दोघांच्या गोलंदाजीपुढे मुंबईचे फलंदाज हतबल झाले होते. मुकेश चौधरीने तीन विकेट घेतल्या. तर समरजीत सिंहला एक विकेट मिळाली. मोईन अलीनेही एक विकेट घेतली. 


चेन्नईची दाणादाण -
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत चेन्नईच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. मुंबईच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईची फलंदाजी कोलमडली. चेन्नईच्या संघाने पावरप्लेमध्ये 30 धावांच्या आत 5 गडी गमावले होते. धोनीच्या एकाकी खेळीच्या बळावर चेन्नई 97 धावांपर्यंत पोहचली. चेन्नईच्या संघाला 20 षटके फलंदाजाही करता आली नाही. डॅनिअल सॅम्सने सुरुवातील चेन्नईला तीन धक्के दिले.. त्यानंतर बुमराह आणि रायली मॅरिडेथ यांनी विकेट घेत अडचणी टाकले.. चेन्नईची फलंदाजी कोसळत असताना त्यात कार्तिकेये यानेही भेदक मारा करत चेन्नईची अवस्था आणखी वाईट केली.