Wisden Cricketer of the year: नुकतीच विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयरची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, विस्डेनचे एडिटर लॉरेंस बूथ यांनी पाच क्रिकेटपटूंच्या नावाची घोषणा केली. या पाच क्रिकेटपटूंच्या यादीत दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे, इंग्लंडचा ऑली रॉबिन्सन, दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाच्या डेन व्हॅन नेकेर्क यांच्याव्यतिरिक्त भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.


इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराहची जबरदस्त कामगिरी
भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराहनं दमदार कामगिरी केली होती. जसप्रीत बुमराच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं दुसरा कसोटी सामना जिंकला होता. या कसोटीत त्यानं एकूण 9 विकेट्स घेतल्या होत्या. तर,  ज्यामुळं विस्डेन क्रिकेट ऑफ इयरमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. या दौऱ्यात जसप्रीत बुमराहनं एकूण 18 विकेट्स घेतल्या. नॉटिंगहॅम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्यानं 46 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या होत्या. तर, दुसऱ्या डावात 64 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. 


इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्माचं योगदान
बूथनं रोहित शर्माच्या फलंदाजीचं कौतूक केलं. इंग्लंड दौऱ्यात भारताला चार कसोटी सामन्यात 2-1 अशी आघाडी देण्यात रोहितनं मोठं योगदान दिलं. रोहितनं पहिल्या सामन्यात 36 आणि 12 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात 83 आणि 21 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत त्यानं पहिल्या डावात 19 आणि दुसऱ्या डावात 59 धावा केल्या. तर, चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्यानं 11 आणि दुसऱ्या डावात 127 धावा केल्या.


पदार्पणाच्या सामन्यात डी कॉनवेचं द्विशतक
डेव्हॉन कॉनवेने कसोटी सामन्यात पदार्पणातच द्विशतक झळकावले आणि न्यूझीलंडला अव्वल स्थानावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 


डेन वेन
द हंड्रेडच्या पहिल्या सत्रात ओव्हलच्या संघाला विजय मिळवून देण्यात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू डेन वेनचा मोलाचा वाटा होता. द हंड्रेड ही इंग्लंडच्या महिला क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारी लीग असल्याचं बूथचं मत आहे.


हे देखील वाचा-