Harbhajan Singh On MI Vs CSK: आयपीएल 2022 च्या 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Mumbai Indians vs Chennai Super Kings) एकमेकांशी भिडणार आहे. मुंबई आणि चेन्नईच्या सामन्यांत प्रेक्षकांना वेगळाच थरार पाहायला मिळतो. मुंबईच्या संघानं आतापर्यंत आयपीएलच्या पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर, चेन्नईच्या संघानं चार वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मुंबईच्या (Mumbai) डीवाय स्टेडियमवर (DY Patil Sports Academy) पुन्हा मुंबई आणि चेन्नई आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटरटू हरभजन सिंहनं मोठं वक्तव्य केलं आहे.
हजभजन सिंहनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयपीएलमध्ये त्यानं मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचं नेतृत्व केलं आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पहिल्यांदाच मुंबई-चेन्नई एकमेकांशी भिडणार आहेत. यापूर्वी हरभजन सिंहनं मोठं वक्तव्य केलं आहे.
हरभजन सिंह काय म्हणाला?
स्टार स्पोर्ट्सच्या शो क्रिकेट लाइव्हमध्ये बोलत असताना हरभजन सिंह म्हणाला की, "तब्बल 10 वर्ष मुंबईच्या संघाकडून खेळल्यानंतर मी पहिल्यांदा चेन्नईची जर्सी घातली तेव्हा मला विचित्र वाटलं. हे दोन्ही संघ माझ्यासाठी खूप खास आहेत. मुंबई-चेन्नई यांच्यातील सामना मला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यासारखा वाटतो. जेव्हा मी मुंबईविरुद्ध पहिल्यांदा मैदानात उतरलो तेव्हा मला सामना लवकर संपवायचा होता. कारण, त्यात दडपण आणि भावना या दोन्ही गोष्टींचा समावेश होता. सुदैवानं सामना लवकर संपला. हा सामना चेन्नईनं जिंकला."
मुंबई-चेन्नईची खराब कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई आणि चेन्नईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाशी आहे. तर, चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचं प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याचं आव्हान संपुष्टात येणार आहे.
हे देखील वाचा-
- MI vs CSK: मुंबईविरुद्ध सामन्यापूर्वी चेन्नईला मोठा धक्का, 'करो या मरो'च्या सामन्यात 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही
- Kuldeep Yadav: मनं जिंकलीस भावा! 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार घेताना कुलदीप यादव नक्की काय म्हणाला?
- Arjun Tendulkar च्या यॉर्करने लक्ष्य भेदलं, IPL 2022 मधील सर्वात महागडा खेळाडू अवाक् झाला!