GT vs MI : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) सुरु असलेल्या सामन्यात यजमान गुजरातनं (GT) प्रथम फलंदाजी कराताना 168 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईने (MI) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईचा संघ फिल्डिंग करताना गोलदाजानं रोहित शर्माला (Rohit Sharma) इग्नोर केल्याचं स्पष्ट दिसले. यावरुन सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईचा संघ रोहित शर्माचा आदर करायचा विसरला का? असा सवाल चाहत्यांनी केला आहे.
हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिलं षटक घेऊन हार्दिक पांड्याच आला होता. हार्दिक पांड्याने आपल्या पहिल्याच षटकात 11 धावा खर्च केल्या. दुसरं षटक घेऊन इंग्लंडचा ल्यूक वूड आला. लूक वूड याला मुंबई इंडियन्सने जेसन बेहरनडार्फच्या जागी संघात घेतलेय. बेहरनडॉर्फ यानं आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याच्या जागी मुंबईने ल्यूक वूड याला संघात स्थान दिलं. ल्यूक वूड यानं डावाचं दुसरं षटक टाकलं. ल्यूक वूड यानं गोलंदाजी करताना रोहित शर्माला इग्नोर केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईवर निशाणा साधला आहे.
रोहित शर्माला केले इग्रोन
डावाचं दुसरं षटक टाकणाऱ्या ल्यूक इग्नोर यानं माजी कर्णधार रोहित शर्माला इग्नोर केले. ल्यूक वूड यानं 142 प्रति किमी वेगानं चेंडू टाकला होता. हा चेंडू वृद्धीमान साहा यानं डिफेंड केला, तो ल्यूक वूड याच्याकडेच आला. त्यानंतर रोहित शर्माला त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी आला होता. पण त्याआधीच ल्यूक वूड हा पाठ दाखवून गेला. ल्यूक वूड यानं रोहित शर्माकडे पाहिलेही नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसला. मुंबई संघाप्रमाणेच ल्यूक वूड यानं रोहित शर्माला इग्नोर केले, असा टोला केले. दरम्यान, याआधी हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा उडाल्या होत्या. त्यातच आता ल्यूक वूड यानं रोहित शर्माला इग्नोर केले. यावरुन चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केलाय. रोहित शर्माला मुंबईकडून हवा तसा सन्मान मिळत नसल्याचा आरोप चाहत्यांनी केलाय.
रोहित शर्माची आक्रमक फलंदाजी -
गुजरातनं दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. ईशान किशन स्वस्तात तंबूत परतला. ईशान किशन याला खातेही उघडता आले नाही. पण दुसऱ्या बाजूला रोहित शर्मानं फटकेबाजी केली. रोहित शर्माने 29 चेंडूमध्ये 43 धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने आपल्या खेळीमध्ये एक षटकार आणि सात चौकार लगावले. रोहित शर्मानं मुंबईच्या डावाला आकार दिला.