अहमदाबाद :आयपीएलमधील (IPL 2024 ) ज्या मॅचची वाट सर्वजण पाहत होते ती मॅच म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांची होय. मुंबईचा कॅप्टनं हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya)टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्या टॉसला आला त्यावेळी प्रेक्षकांनी त्याला चिडवलं. काही प्रेक्षकांनी रोहित रोहित अशा घोषणा देखील दिल्या. प्रेक्षकांनी केलेल्या या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्या यावेळी मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व करत आहे. हार्दिक पांड्यानं गुजरात टायटन्सला पहिल्याच स्पर्धेत म्हणजेच 2022 मध्ये विजेतेपद मिळवून दिलं होतं. हार्दिक पांड्याच्याच नेतृत्त्वात गुजरात टायटन्सनं 2023 च्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं होतं. मात्र,गुजरातच्या आयपीएलमधील दोन स्पर्धांनंतर हार्दिकनं मुंबई इंडियन्सकडे जाण्याचा निर्णय घेतला. यामुळं गुजरातच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला चिडवलं.
हार्दिक पांड्यापुढं रोहित रोहितच्या घोषणा
हार्दिक पांडयाला मुंबईच्या मॅनेजमेंटनं 2021 मध्ये रिटेन केलं नव्हतं. 2020 ला मुंबईनं आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. मात्र, 2021, 2022 आणि 2023 मध्ये मुंबईला विजेतेपद पटकावता आलं नव्हतं. मुंबईच्या टीमची कामगिरी चांगली होत नसल्यानं मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटनं हार्दिक पांड्याला संघात घेत त्याच्याकडे नेतृत्त्व दिलं होतं. मुंबईचा हा निर्णय चाहत्यांना आवडला नव्हता. रोहित शर्मानं 10 वर्षात पाचवेळा मुंबईला विजेतेपद मिळवून दिलं होतं. ज्या प्रकारे मुंबईचे फॅन्स नाराज झाले होते.
हार्दिक पांड्यानं गुजरात टायटन्सची कॅप्टनसी सोडल्यानं गुजरातचे फॅन्स देखील नाराज झाले असावेत. आज हार्दिक पांड्या मुंबईच्या पहिल्याच मॅचचं नेतृत्त्व करत असल्यानं अहमदाबादच्या स्टेडियमवर जमललेल्या प्रेक्षकांनी हार्दिक पांड्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गुजरातचं टीमचं मुंबईपुढं किती धावांचं आव्हानं ठेवलं?
गुजरातच्या टीमनं सुरुवातीला सावध फलंदाजी सुरु केली होती.शुभमन गिल आणि साहानं गुजरातच्या डावाची सुरावत केली. गुजरातला पहिला धक्का धक्का चौथ्या ओव्हरमध्ये साहाच्या रुपानं बसला साहानं 16 धावा केल्या. यानंतर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी जोरदार बॅटिंग केली. शुभमन गिलला पियूष चावलानं 31 धावांवर बाद केलं. यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या ओमरझाईनं 17 धावा केल्या.
साई सुदर्शन 45 धावा करुन बाद झाला. तर डेव्हिड मिलरला केवळ 12 धावा करता आल्या. राहुल तेवतियानं 22 धावा केल्या. विजय शंकरनं 6 धावा केल्या. राशिद खाननं 4 धावा केल्या. गुजरातनं मुंबईपुढे 169 धावांचं आव्हान ठेवलं आहे. गुजरातनं 20 ओव्हर्समध्ये 6 विकेटवर 169 धावा केल्या.
संबंधित बातम्या :
IPL 2024 : हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IPL 2024 RR vs LSG : राहुल-पूरनची अर्धशतकं व्यर्थ, राजस्थानकडून लखनौचा 20 धावांनी पराभव