MS Dhoni vs Virat Kohli In IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स (RCB vs CSK) यांच्यामधील सामन्यानं यंदाच्या आयपीएलची (IPL 2024) सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यानं शेकडो चाहत्यांचं मनोरंजन केले. पहिल्याच सामन्यात चेन्नईनं आरसीबीचा (CSK vs RCB) पराभव करत विजयी सुरुवात केली. याच पराभवाचा वचपा आरसीबीला काढता येणार नाही, कारण आयपीएलच्या 17 व्या हंगामात साखळी फेरीत चेन्नई आणि आरसीबी यांच्यात पुन्हा सामना होणार नाही. प्लेऑफ अथवा फायनलमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात, पण साखळी फेरीत यंदाच्या हंगामात या दोन्ही संघामध्ये सामना होणार नाही. त्याचं कारणही तसेच आहे.. धोनीच्या सीएसके आणि विराटच्या आरसीबीला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. 


आयपीएल 2024 मध्ये दहा संघ आहेत. या दहा संघांना एकाच ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. अ आणि ब असे दोन ग्रुप करण्यात आलेले आहेत. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. एकाच ग्रुपमध्ये असणारे संघ फक्त एकदाच आमनेसामने येतील. तर दुसऱ्या ग्रुपमधील प्रत्येक संघाविरोधात दोन दोन सामने होतात. आरसीबी आणि सीएसके संघाला ब ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे.


एकाच ग्रुपमध्ये असणाऱ्या संघामध्ये फक्त एकवेळा आमनासामना होतो. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये असणाऱ्या संघामध्ये प्रत्येकी दोन वेळा लढत होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये साखळी फेरीत पुन्हा सामना होणार आहे. पण प्ले ऑफ अथवा फायनलमध्ये हे संघ आमने सामने येऊ शकतात. पण ग्रुप स्टेजमध्ये धोनी आणि विराट यांच्यामध्ये आता आमनासामना होणार नाही.


कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये ?


ग्रुप अ - 


मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स


ग्रुप ब  - 


चेन्नई सुपर किंग्स,सनरायजर्स हैदराबाद,रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु,पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स



फायनल अन् क्वालिफायर सामने कोणत्या मैदानात होणार ?


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2024) चा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिला क्वालिफायर सामना आणि एक एलिमिनेटरचा सामना तर दुसरा क्वालिफायर सामना चेन्नईमध्ये होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पीटीआयनं याबाबतचं वृत्त दिले आहे.