IPL 2025 Mumbai Indians : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने एक मोठे पाऊल उचलले आहे. मुंबईने संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांना हटवले आहे. बाउचर यांनी 2023 मध्ये हे पद स्वीकारले होते. त्याच्या प्रशिक्षणातच रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई संघाचे कर्णधारपद मिळाले होते.


गेल्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आणि मार्क बाउचर यांच्या देखरेखीखाली मुंबई संघ सर्वात खालच्या स्थानावर होता. संघाने 14 पैकी फक्त चार सामने जिंकले. त्यामुळेच मुंबई फ्रँचायझीने हे पाऊल उचलले आहे. बाउचरच्या जागी त्याने पुन्हा एकदा श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. 






जयवर्धनेच्या कोचिंगमध्ये मुंबई 3 वेळा आयपीएल चॅम्पियन


2017 मध्ये जयवर्धने पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. तेव्हापासून 2022 पर्यंत, त्याच्या देखरेखीखाली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने तीनदा (2017, 2019, 2020) आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. जयवर्धने यापूर्वी मुंबईसाठी जागतिक क्रिकेट प्रमुखाची भूमिका बजावत होता. मुंबई फ्रँचायझी केवळ IPL मध्येच नाही तर जगातील प्रत्येक लीगमध्ये खेळत आहे. त्याच्यासाठीही काम करत होते. मात्र आता जयवर्धनेचे लक्ष पुन्हा मुंबई संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यावर असेल.






रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार?


महेला जयवर्धने पुन्हा मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक बनला आहे. रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माने जयवर्धनेच्या नेतृत्वाखाली संघाची कमान सांभाळली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 विजेतेपद पटकावले आहेत. महेला जयवर्धने आणि रोहित शर्मा या जोडीने मिळून एकूण 3 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.


मात्र, आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले. त्यामुळे मुंबईसाठी रोहितचा हा आयपीएलमधील शेवटचा हंगाम असू शकतो, अशा बातम्या येत होत्या. पण आता मार्क बाउचर गेल्यानंतर परिस्थिती बदलू शकते. 


हे ही वाचा -


Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवणाऱ्या कोचची हकालपट्टी; 'या' दिग्गजाची केली नियुक्ती


Ind vs Aus : सामना सुरू झाल्यानंतर टीम इंडियाने अचानक बदलले प्लेईंग-11, स्टार खेळाडू बाहेर, जाणून घ्या कारण