DC vs LSG, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट्स (DC vs KKR) या दोन्ही संघात सामना पार पडणार आहे. यामध्ये लखनौसाठी आजचा विजय त्यांच पुढील फेरीतील तिकीट जवळपास निश्चित करेल. तर दिल्लीसाठी स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. गुणतालिकेचा विचार करता लखनौ तिसऱ्या स्थानी असून त्यांनी 9 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. तर दुसरीकडे दिल्ली 8 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. 


आज होणाऱ्या  दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स या सामन्यात दोन्ही संघाकडून एक दमदार खेळी पाहायला मिळू शकते. त्यात दोन्ही संघात बदलाचा विचार करता लखनौचा फॉर्म कमाल असल्याने ते कोणाताही बदल करण्याची शक्यता कमीच आहे. पण दिल्लीचा महत्त्वाचा गोलंदाज खलीली अहमद दुखापतग्रस्त असल्याने त्याला विश्रांती मिळू शकते. दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यांत खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...


दिल्ली विरुद्ध लखनौ अशी असेल ड्रीम 11 (DC vs LSG Best Dream 11)


विकेटकीपर- ऋषभ पंत


फलंदाज- डेव्हिड वॉर्नर, केएल राहुल, पृथ्वी शॉ


ऑलराउंडर-कृणाल पांड्या, मार्कस स्टोयनिस, रोवमेन पॉवेल


गोलंदाज- चेतन सकारिया, कुलदीप यादव, आवेश खान, रवी बिश्नोई


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. मैदानात सुरुवातीचे काही सामने हे चेस करणाऱ्या संघाच्या दिशेने झुकलेले पाहायला मिळालं. पण मागील काही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होताना दिसत आहे. इतर मैदानांपेक्षा काहीसं छोटं मैदान असल्याने षटकार, चौकारांची बरसात याठिकाणी होत असते. त्यामुळे वानखेडे मैदानात मोठी धावसंख्या उभी राहताना दिसते. पण आजचा सामना  सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी घेण्याचे समसमान चान्सेस आहेत. 


हे ही वाचा -