SRH vs CSK : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यानंतर हैदराबाद आणि चेन्नई हे संघ मैदानात उतरणार आहेत. गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या हैदराबादला आजचा विजय पुढील फेरीत एन्ट्रीसाठी महत्त्वाचा आहे. तर चेन्नईच्या संघाच पुढील फेरीत पोहोचणं अवघड असलं तरी स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ते आज लढतील. पण आतापर्यंतच्या इतिहासात चेन्नईचं आव्हान हैदराबादला अवघड पडल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. 


आजचा सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामना पुण्यातील एमसीए मैदानावर होणार आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. फलंदाजीला पोषक मैदान असेल. दव पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. रवींद्र जाडेजाने कर्णधारपद सोडल्यानंतर पुन्हा एकदा चेन्नईची धुरा धोनीच्या खांद्यावर आल्याने आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल.


कधी आहे सामना?


आज 1 मे रोजी होणारा सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना पुण्यातील एमसीए मैदानावर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे ही वाचा -