IPL 2025: आयपीएल 2025 साठी सर्व 10 संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. संघांना जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेवण्याचा अधिकार होता, तरीही फक्त 2 संघांनी 6 खेळाडू कायम ठेवले. तर इतर संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची संख्या 6 पेक्षा कमी होती. त्याचवेळी संघांनी अनेक दिग्गज खेळाडूंना रिलीज केले. त्यामुळे अनेकांना आता मेगा लिलावात उतरावे लागणार आहे.
चार कर्णधारांना केले रिलीज-
10 पैकी 4 आयपीएल फ्रँचायझींनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करताना कर्णधारांना रिलीज केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि गेल्या हंगामातील चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स यांनी संघाच्या कर्णधारांना रिलीज केले आहे. कोलकाता नाईट रायडर्स फँचायझीचा कर्णधाराला रिलीज करण्याचा निर्णय सर्वात आश्चर्यकारक होता.
श्रेयस अय्यरला केले रिलीज-
केकेआरने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मागील हंगामात म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये विजेतेपद पटकावले होते. आता आयपीएल 2025 च्या आधी, फ्रँचायझीने विजेतेपद विजेत्या कर्णधाराला रिलीज केले आहे. याशिवाय रिषभ पंत, केएल राहुल आणि फाफ डू प्लेसिसला देखील संघातून रिलीज करण्यात आले आहे. ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केले आहे. गेल्या काही हंगामात पंत दिल्लीचे नेतृत्व करत होता. याशिवाय फाफ डू प्लेसिसला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु तर केएल राहुलला लखनौ सुपर जायंट्स संघाचा नेतृत्व करत होता. केएल राहुल 2022 पासून लखनौचा कर्णधार होता.
मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजही लिलावात सहभागी होणार-
रिलीज होणाऱ्यांमध्ये टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे. मोहम्मद शमीला गुजरातने सोडले, तर मोहम्मद सिराजला आरसीबीने सोडले.
आयपीएल 2025 च्या लिलावात 25 दिग्गज दिसणार-
ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल शार्दुल, दीपक चहर, मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक, फिल सॉल्ट, डेव्हिड वॉर्नर, क्विंटन डी कॉक, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, डेव्हिड मिलर, अँडन मार्कराम.
मेगा लिलावाआधी नवीन नियम जाहीर-
बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने मेगा लिलावाआधी नवीन नियम जाहीर केले आहेत. यामध्ये आयपीएलमधील (IPL) एक संघ जास्तीत जास्त 5 खेळाडूंना संघात कायम ठेवू शकतील. तर राईट टू मॅचचा (RTM) वापर करुन आणखी एक खेळाडू संघात ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. आयपीएल 2025 मधील एखाद्या संघाने 5 खेळाडूंना कायम केले, तर त्यांना तब्बल 75 कोटी रुपये मोजावे लागणार आहे.