IPL: 5 खेळाडूंना फँचायझीने कधीही संघातून रिलीज केले नाही; शेवटपर्यंत एकच टीम, आयपीएलमध्ये रचला इतिहास
आयपीएलची सुरुवात 2008 पासून झाली. आयपीएलच्या प्रत्येक हंगामानंतर फ्रँचायझी खेळाडूंना संघातून रिलीज म्हणजेच काढू शकते. (Photo Credit-IPL)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपैशांचा विचार करता फ्रँचायझीची इच्छा नसतानाही काही खेळाडूंना रिलीज करावं लागतं. यानंतरही, आयपीएलच्या इतिहासात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना फ्रँचायझीने कधीही सोडले नाही. (Photo Credit-IPL)
सुनील नरेन- (कोलकाता नाइट रायडर्स- आयपीएल 2012 पूर्वी सुनील नरेन कोलकाता नाईट रायडर्सचा भाग बनला होता. तेव्हापासून तो संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. तेव्हापासून आयपीएलचे 3 मेगा लिलाव झाले. फ्रँचायझीने वेस्ट इंडिजच्या या खेळाडूला एकदाही सोडले नाही.(Photo Credit-IPL)
ऋषभ पंत- (दिल्ली कॅपिटल्स)- 19 वर्षाखालील क्रिकेटमध्ये चांगली खेळी केल्यानंतर 2016 मध्ये ऋषभ पंतने आयपीएलमध्ये पदार्पण केले. दिल्ली कॅपिटल्सने पंतला संघात सामील करुन घेतले. 2018 च्या मेगा लिलावापूर्वी आणि नंतर 2022 च्या मेगा लिलावापूर्वी संघाने पंतला कायम ठेवले होते.(Photo Credit-IPL)
शेन वॉर्न- (राजस्थान रॉयल्स)- ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नला राजस्थान रॉयल्सने 2008 च्या लिलावात विकत घेतले होते. वॉर्नने शेवटचा आयपीएल सामना 2011 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला होता. (Photo Credit-IPL)
विराट कोहली- (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)- विराट कोहलीला आरसीबीने आयपीएल 2008 पूर्वी अनकॅप्ड खेळाडू म्हणून करारबद्ध केले होते. तेव्हापासून विराट कोहली आरसीबीचा भाग आहे. 17 वर्षात आरसीबीने विराटला कधीही रिलीज केले नाही. आयपीएलमध्येही विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत.(Photo Credit-IPL)
सचिन तेंडुलकर-(मुंबई इंडियन्स)- आयपीएल 2008 च्या लिलावापूर्वी सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सशी आयकॉन खेळाडू म्हणून जोडला गेला होता. 2013 मध्ये सचिनने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मुंबई इंडियन्सने देखील सचिनला कधीही रिलीज केले नाही.(Photo Credit-IPL)