Rishabh Pant, IPL 2024 : दुखापतीनंतर ऋषभ पंत यानं दमदार कमबॅक केलेय. ऋषभ पंतच्या याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. आज गुजरातविरोधात पंत यानं कठीण परिस्थितीमध्ये शानदार अर्धशतक ठोकलं. पंत यानं गुजरातविरोधात 43 चेंडूमध्ये 88 धावांची वादळी खेळी केली. पंत यानं 205 च्या स्ट्राईक रेटनं गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. पंत यानं आपल्या विस्फोटक खेळीमध्ये आठ षटकार आणि पाच चौकार ठोकले. पंत यानं वादळी अर्धशतक ठोकत मोठा विक्रम केलाय. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा चोपणाऱ्या फलंदाजमध्ये पंत आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. पंतकडून विराट कोहलीला टक्कर दिली जातेय. त्याशिवाय पंत यानं टी 20 विश्वचषकासाठी आपली दावेदारी पेश केली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर ?
ऋषभ पंत यानं आज 88 धावांची खेळी करत यंदाच्या हंगामात सर्वाधिक दावा कऱणाऱ्या फलंदाजामद्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ऋषभ पंत यानं 9 सामन्यात 342 धावांचा पाऊस पाडला आहे. सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट कोहली अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. विराट कोहलीनं आठ सामन्यात 379 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं दोन अर्धशतक आणि एक शतक ठोकलेय. दुसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडचा क्रमांक लागतोय. गायकवाडनं आठ सामन्यात 349 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकाचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर पंत आहे. चौथ्या क्रमांकावर गुजरातचा साई सुदर्शन आहे, त्यानं नऊ सामन्यात 334 धावा केल्यात. पाचव्या क्रमांकावर ट्रेविस हेड आहे, त्यानं सहा सामन्या 324 धावा केल्या आहेत. रियान पराग 318 धावांसह सहाव्या स्थानावर आहे. संजू सॅमसन 314 धावांसह सातव्या तर 311 धावांसह शिवम दुबे आठव्या क्रमांकावर आहे.
यंदाच्या हंगामात पंतची कामगिरी कशी राहिली ?
ऋषभ पंत यानं दुखापतीनंतर शानदार कमबॅक केलेय. पंत तब्बल दीड वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतलाय. पंत यानं पहिल्या सामन्यापासूनच शानदार फलंदाजी केली. पंत यानं 9 सामन्यात 342 धावांचा पाऊस पाडला. पंत दोनवेळा नाबाद राहिलाय. पंत यानं 49 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय. पंत यानं 162 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडलाय. पंत यानं आतापर्यंत 3 अर्धशतकं ठोकली आहेत. ऋषभ पंत यानं दिल्लीसाठी 21 षटकार ठोकले आहेत, त्याशिवाय 27 चौकारांचा पाऊसही पाडलाय.