DC vs GT, IPL 2024 : गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्स घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. शुभमन गिलसाठी आजचा सामना खास आहे. शुभमन गिल आयपीएलमधील 100 वा सामना आज खेळत आहे. गुजरातच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीने आपल्या संघत दोन बदल केले आहेत. दिल्लीने डेविड वॉर्नर आणि ललित यादव यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ललित यादव इम्पॅक्ट खेळाडूच्या यादीत आहे, पण त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.


गुणतालिकेत दोन्ही संघ कुठे ?


गुजरातने आठ सामन्यात चार विजय मिळवले आहेत. शुभमन गिलच्या गुजरातकडे आठ गुण आहेत. गुजरातचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत. तर दिल्लीने आठ सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. सहा गुणांसह दिल्लीचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि गुजरातसाठी आजचा सामना महत्वाचा आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीला आजचा विजय महत्वाचा आहे.  


दिल्लीच्या ताफ्यात कोण कोण ?
पृथ्वी शॉ, जेक प्रेसर मॅकगर्क, शाय होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अनरिक नॉर्खिया, मुकेश कुमार, खलील अहमद


इम्पॅक्ट सब - सुमित कुमार, रासीख, कुमार कुशाग्र, दुबे, ललित यादव


Delhi Capitals : 1 Prithvi Shaw, 2 Jake Fraser-McGurk, 3 Shai Hope, 4 Rishabh Pant (capt & wk), 5 Tristan Stubbs, 6 Abishek Porel, 7 Axar Patel, 8 Kuldeep Yadav, 9 Anrich Nortje, 10 Mukesh Kumar, 11 Khaleel Ahmed.


Impact Subs: Sumit, Rasikh, Kushagra, Dubey and Lalit


गुजरातचे 11 शिलेदार कोणते ?


शुभमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, अजमुत्तालाह ओमरजई, डेविड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवातिया, आर. साई किशोर, राशीद खान, नूर अमहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर


इम्पॅक्ट सब - शरथ, विजय शंकर, सुतार, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे


Gujarat Titans: 1 Shubman Gill (capt), 2 Wriddhiman Saha, 3 Azmatullah Omarzai, 4 David Miller, 5 Shahrukh Khan, 6 Rahul Tewatia, 7 R Sai Kishore, 8 Rashid Khan, 9 Noor Ahmad, 10 Mohit Sharma, 11 Sandeep Warrier. 


Impact Subs: Sharath, Shankar, Suthar, Sudharsan and Nalkande