RCB vs RR, IPL 2023 : राजस्थान आणि बेंगलोर या दोन संघामध्ये रॉयल सामना होत आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने बेंगलोरच्या मैदानावर नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. आरसीबी प्रथम फलंदाजी करणार आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली नाणेफेकीनंतर प्रथम फलंदाजी करायला आवडेल असे सांगितलेय. गुणतालिकेत राजस्थान सध्या पहिल्या स्थानावर आहे. तर आरसीबीचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत पुढे जाण्यासाठी आजचा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरतील. आरसीबीच्या संघात क बदल करण्यात आला आहे. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11 


राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ :
 विराट कोहली (कर्णधार), फाफ डु प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज़ अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, डेविड विली, वानिंदु हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाक


राजस्थान रॉयल्स प्लेईंग ११ :
 जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सैमसन (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल


हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आरसीबी
सोशल मीडियावर आरसीबीच्या ग्रीन जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या ग्रीन जर्सीमध्ये विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक दिसत आहेत. आरसीबीची ग्रीन जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडल्याचं दिसून येत आहे.  आरसीबी 23 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर ग्रीन जर्सी परिधान करुन मैदानात उतरणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ एका सामन्यात ही हिरवी जर्सी परिधान करतात. यंदाही आरसीबी ही परंपरा कायम राखणार आहे. 


RCB vs RR Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि पंजाब (PBKS) या संघांमध्ये आतापर्यंत 28 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरु संघाचं पारड किंचित जड दिसून आलं आहे. आरसीबी संघाने 28 पैकी 13 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान संघाने 12 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


M. Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल
बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.