Rohit Sharma In IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 31 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात लढत पाहायला मिळाली. या सामन्यात मुंबई संघाला 13 धावांनी पराभव पत्करावा लागला. पण असं असलं तरी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये 250 षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात 250 षटकार ठोकणारा 'हिटमॅन' तिसरा खेळाडू आहे.


आयपीएलमध्ये 'हिटमॅन'ची ऐतिहासिक कामगिरी


मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने पंजाब विरुद्धच्या सामन्यात 27 चेंडूत 44 धावांची खेळी केली. त्याने चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. या खेळीसोबत त्याने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात 250 षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स आहे.


'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू


रोहित शर्मा आयपीएलमध्ये 250 षटकार ठोकणारा तिसरा खेळाडू आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 357 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स आहे. डिव्हिलियर्सच्या नावावर आयपीएलमध्ये 251 षटकार ठोकल्याची नोंद आहे. त्यानंतर आता रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 


रोहित शर्माच्या आयपीएलमध्ये 6000 धावा


मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीतील सहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. ही कामगिरी करणारा रोहित शर्मा आयपीएलमदील चौथा खेळाडू ठरला आहे. रोहितने सामन्याच्या 2.2 षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर चौकार मात आयपीएलमध्ये सहा हजार धावा पूर्ण केल्या.


पंजाबकडून मुंबईचा 13 धावांनी पराभव


अर्शदीप सिंह याच्या चार विकेटच्या बळावर पंजाबने मुंबईचा 13 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन यांनी वादळी अर्धशतके झळकावली. पण मुंबईला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले. कारण, अखेरच्या दोन षटकात अर्शदीप याने अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबला विजय मिळवून दिला. पंजाबने दिलेल्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच संघ सहा विकेटच्या मोबदल्यात 201 धावांपर्यंत मजल मारु शकला. पंजाबने अखेरच्या पाच षटकात 96 धावा चोपल्या होत्या. मुंबईला अखेरच्या पाच षटकात 67 धावा करता आल्या नाहीत आणि पंजाबने सामना 13 धावांनी जिंकला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : 'किंग' कोहलीचा Beast Mode On... वर्कआऊटचा व्हिडीओ पाहून चाहते दंग; तुम्हीही पाहा एक झलक