IPL 2023 RCB Green Jersey : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगणार आहे. बंगळुरुच्या घरच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात आरसीबी हिरव्या रंगाची जर्सी घालून उतरणार आहे. आजचा सामना बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर होणार आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या आजच्या सामन्यातन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ हिरव्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे. 


हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आरसीबी


सोशल मीडियावर आरसीबीच्या ग्रीन जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या ग्रीन जर्सीमध्ये विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक दिसत आहेत. आरसीबीची ग्रीन जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडल्याचं दिसून येत आहे.  




हिरव्या रंगाची जर्सी घालण्याचं कारण काय?


आरसीबी 23 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर ग्रीन जर्सी परिधान करुन मैदानात उतरणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ एका सामन्यात ही हिरवी जर्सी परिधान करतात. यंदाही आरसीबी ही परंपरा कायम राखणार आहे. 


हिरव्या रंगाची जर्सी संघासाठी अनलकी?


प्रत्येकवर्षी एका सामन्यासाठी आरसीबी ही जर्सी घालून मैदानात उतरते. आयपीएलच्या चौथ्या हंगामात आरसीबीचा कोच्ची टस्कर्सविरुद्ध पहिल्यांदा हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरला होता. 2021 मध्ये आरसीबीच्या या परंपरेला खंड पडला होता. कारण, कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आरसीबीचा संघ निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरला होता.  आरसीबीचा संघ प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला एक झाडही भेट म्हणून देतो. दरम्यान, ग्रीन जर्सीमध्ये त्यांना पराभवाचाच सामना जास्त करावा लागत आहे. ग्रीन जर्सी आरसीबीसीठी अनलकी असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. 


हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये आरसीबीची कामगिरी -  



  • आयपीएल 2011 - विजय

  • आयपीएल 2012 - पराभव

  • आयपीएल 2013 - पराभव

  • आयपीएल 2014 - पराभव

  • आयपीएल 2015 - निकाल नाही

  • आयपीएल 2016 - विजय

  • आयपीएल 2017 - पराभव

  • आयपीएल 2018 - पराभव

  • आयपीएल 2019 - पराभव

  • आयपीएल 2020 - पराभव

  • आयपीएल 2021 - निळ्या रंगाची जर्सी (पराभव)


राजस्थान आणि बंगळुरु आमने-सामने


आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 32 वा सामना आज, 23 एप्रिलला बंगळुरुच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : 'किंग' कोहलीचा Beast Mode On... वर्कआऊटचा व्हिडीओ पाहून चाहते दंग; तुम्हीही पाहा एक झलक