Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपर जायंटस् (LSG) यांच्यात सामना रंगणार आहे. लखनौच्या घरच्या मैदानावर म्हणजे हा सामना खेळवला जाईल. 9 एप्रिल रोजी, रविवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील तेरावा सामना (IPL 2023 Match 13 ) पाहायला मिळेल.  राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पाहायला मिळणार आहे.


IPL 2023 : आरसीबी आणि लखनौ आमने-सामने


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2023 मध्ये दोन सामने खेळले असून पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला तर, दुसऱ्या सामन्यात कोलकाताकडून पराभव पत्करावा लागला. लखनौ विरोधात आता आरसीबीचा यंदाच्या मोसमातील हा तिसरा सामना असेल. तर, दुसरीकडे लखनौने यंदाच्या मोसमात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात लखनौने दिल्लीचा पराभव केला तर, संघाला दुसऱ्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरच्या सामन्यात लखनौने हैदराबादवर विजय मिळवला. आज लखनौचा आयपीएलमधील चौथा सामना असेल.


M Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे?


आज संध्याकाळी 7.30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात लढत होणार आहे. बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.


RCB vs LSG Probable Playing XI : बंगळुरु विरुद्ध लखनौ संभाव्य प्लेईंग 11


RCB Playing XI : आरसीबी संभाव्य प्लेईंग 11


एफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मायकल ब्रेसवेल, महिपाल लोमरोर, जीजे मॅक्सवेल, शाहबाज अहमद, डीजे विली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, कर्ण शर्मा


LSG Playing XI : लखनौ संभाव्य प्लेईंग 11


केएल राहुल (कर्णधार), यश ठाकूर, काइल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पांड्या, निकोलस पूरन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्क वुड, रवी बिश्नोई, जयदेव उनाडकट, अमित मिश्रा


महत्त्वाच्या इतर बातम्या :


RCB vs LSG Preview : आरसीबी आणि लखनौमध्ये रणसंग्राम; बंगळुरुला विजय मिळणार की केएल राहुल वरचढ ठरणार? आतापर्यंतचा रेकॉर्ड जाणून घ्या...