Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru IPL 2024: आज कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात सामना होणार आहे. कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी केकेआरचा फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) आणि आरसीबीचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. रिंकू सिंग विराट कोहलीकडे नवीन बॅट मागत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
विराट कोहलीने रिंकू सिंगला एक बॅट दिली होती. आयपीएलदरम्यान फलंदाजी करताना रिंकू सिंगची ती बॅट तुटली. त्यानंतर तो कोहलीकडे नवीन बॅटची मागणी करत होता. केकेआरच्या कॅमेरामनने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली. रिंकू कोहलीच्या आणखी दोन बॅट्सकडे पाहत आहे. हे पाहून कोहली थोडासा नाराज होऊन रिंकूला विचारतो की ती बॅट कुठे हरवली आणि तो त्याची दुसरी बॅट का मागतोय?, रिंकूने उत्तर देण्यापूर्वीच कोहली गंमतीने रिंकूला सांगतो की, जर त्याने दोन सामन्यांमध्ये रिंकूला बॅट दिल्या तर स्पर्धेच्या भविष्यातील सामन्यांमध्ये त्याला अडचणी येऊ शकतात. यावर शपथ घेतो, पुन्हा बॅट तोडणार नाही, असं रिंकू सिंग बोलताना दिसतो. हा व्हिडीओ सध्या सोशली मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा संपूर्ण व्हिडीओ-
आरसीबी घरच्या मैदानावर पराभवाचा बदला घेऊ शकेल का?
आयपीएल 2024 चा 10 वा सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB आणि KKR यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोहलीने 59 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने अवघ्या 16.5 षटकांत 3 गडी गमावून 186 धावा केल्या. 9 चेंडू बाकी असताना 7 गडी राखून सामना जिंकला होता.
गुणतालिकेची काय स्थिती?
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा दबदबा कायम आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचे 7 सामन्यांत 12 गुण आहेत. यानंतर सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. उर्वरित संघांबद्दल बोलायचे झाल्यास, गुजरात टायटन्स 7 सामन्यांत 6 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्ज 7 सामन्यांत 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 7 सामन्यांत 2 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या स्थानावर-
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हैदराबादचा ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ट्रॅव्हिस हेडने 6 सामन्यात 324 धावा केल्या आहेत. तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीने 7 सामन्यात 361 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात 37 धावांचे अंतर आहे. यानंतर अनुक्रमे रियान पराग, रोहित शर्मा आणि केएल राहुल यादीत आहे.
संबंधित बातम्या:
आजही विश्वचषकाच्या आठवणीत कोहली; गंभीरला भेटला अन् त्या विकेटबद्दल सर्वच सांगितलं, पाहा Video
विश्वचषक ते आयपीएल! निळ्या रंगाची जर्सी दिसताच ट्रेव्हिड हेड पेटून उठतो; रेकॉर्ड काय?, नक्की पाहा