Virat Kohli And Gautam Gambhir: आज कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात सामना होणार आहे. कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरु होईल. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताचा संघ तिसऱ्या क्रमांकावर असून बंगळुरुचा संघ दहाव्या स्थानावर आहे.


कोलकाता आणि बंगळुरुच्या सामन्याआधी विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांची सरावशिबारादरम्यान भेट झाली. यावेळी कोहली आणि गंभीर विविध मुद्द्यांवर चर्चा करताना दिसले. केकेआरच्या एक्स (आधीचे ट्विटर) हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर त्यांचे जुने मुद्दे विसरून एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. विराट कोहली केकेआरच्या सराव शिबिरात आला होता आणि केकेआर संघाचा मार्गदर्शक गंभीरसोबत खूप चर्चा करताना दिसला.






वन-डे विश्वचषक 2023 च्या विकेट्सबाबत चर्चा?


कोहली आणि गंभीर अनेकवेळ गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी कोहली भारतात झालेल्या वन-डे विश्वचषकात कसा बाद झाला होता, याबाबत सांगताना दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विराट कोहली पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला होता. 






आयपीएलमधील या आधीच्या सामन्यात गंभीरने कोहलीला मारली होती मिठी-


आरसीबी आणि कोलकाता यांच्यात 29 मार्च रोजी झालेल्या सामन्यात गंभीरने कोहलीची भरमैदानात येऊन भेट घेतली होती. टाइम आऊट दरम्यान गंभीर मैदानावर आला आणि येताच त्याने सर्वप्रथम कोहलीची भेट घेतली आणि त्याला मिठी मारली. या सुंदर क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक चाहते आश्चर्यचकित झाले.


गंभीर-कोहली भेटीवर रवी शास्त्री-सुनील गावसकर काय म्हणाले?


विराट कोहली आणि गौतम गंभीरची मैदानात गळाभेट होताच भारतीय क्रिकेट संघाच्या दोन दिग्गज खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया दिली होती. 'विराट कोहली आणि गौतम गंभीरच्या गळाभेटीसाठी केकेआरला फेअरप्ले पुरस्कार', असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. तर 'केवळ फेअरप्ले पुरस्कारच नाही, तर ऑस्कर पुरस्कार देखील', असं सुनील गावसकर म्हणाले. सामन्यादरम्यान समालोचन करताना दोघांनी ही प्रतिक्रिया दिली.


संबंधित बातम्या:


विश्वचषक ते आयपीएल! निळ्या रंगाची जर्सी दिसताच ट्रेव्हिड हेड पेटून उठतो; रेकॉर्ड काय?, नक्की पाहा


ट्रॅव्हिस हेडची पत्नीची पुन्हा एकदा रंगली चर्चा; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ, पाहा Photo


कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video