SRH vs DC IPL 2024: सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) यांची विक्रमी सलामी, शाहबाझ अहमदचे अर्धशतक आणि गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएल-17 च्या हंगामात शनिवारी दिल्ली कॅपिटल्सवर 67 धावांनी शानदार विजय मिळवला. 


हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी 6.2 षटकांत तब्बल 131 धावांची सलामी दिली. दोघांच्या फलंदाजीमुळे हैदराबादने पावरप्लेमध्ये एकही गडी न गमावता विक्रमी 125 धावा केल्या. कुलदीपने अभिषेकला बाद केले. त्याने 12 चेंडूंत दोन चौकार व सहा षटकारांसह 46 धावा केल्या. याच षटकात कुलदीपने एडन मार्करमला 1 धावावर बाद केले. कुलदीपने ट्रॅव्हिस हेडला बाद केले. त्याने 32 चेंडूंत 11 चौकार आणि सहा षटकारांसह 89 धावा केल्या.


निळ्या रंगाच्या जर्सीसमोर ट्रेव्हिस हेडचा बोलबाला-


भारतात झालेला आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 तुम्हाला आठवतंच असेल. ट्रॅव्हिस हेडने वन-डे विश्वचषकांत भारताला आपल्या फलंदाजीतून रडवलं होतं आणि ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून दिला होता.भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्व 2023 च्या अंतिम सामन्यात, ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. विश्वचषकांत इतर संघासमोर हेडला अपयश आले होते. मात्र भारतासमोर त्याने आक्रमक खेळी करत भारताते विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मोडले. 


आयपीएलमध्ये निळ्या जर्सीसमोर काय?


आयपीएलमध्ये देखील निळ्या जर्सी असलेल्या संघासमोर ट्रेव्हिस हेडचा चांगलाच बोलबाला राहिला आहे. मुंबई इंडियन्ससमोर हेडने 24 चेंडूत 62 धावा केल्या होत्या. तर काल दिल्लीसमोर 32 चेंडूत 89 धावा केल्या. आरसीबीसमोर हेडने शतक झळकावले होते. आरसीबीच्या नवीन जर्सीच्या रंगामध्ये आता लाल रंगासोबतच निळा रंग देखील आहे. आरसीबीसमोर हेडने 41 चेंडूत 102 धावा केल्या होत्या. 


इतर रंगाच्या जर्सीसमोर हेडचा रेकॉर्ड काय?


चेन्नईविरुद्ध हेडने 24 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. तर पंजाबसमोर 15 चेंडूत 21 धावा करत हेड बाद झाला होता. 


दिल्लीनेही 8 षटकांत 131 धावा केल्या होत्या, पण...


दिल्लीने 8 षटकांत 131 धावा केल्या होत्या, मात्र जेक फ्रेझरची विकेट पडल्यानंतर दिल्लीच्या धावांचा वेग मंदावला. 15 षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या 6 विकेट गमावून 166 धावा होती आणि त्यांना विजयासाठी 30 चेंडूत 101 धावांची गरज होती. ऋषभ पंत मैदानात उभा असला तरी शेवटच्या 12 चेंडूत संघाला 68 धावांची गरज होती अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्सला लक्ष्य गाठणे जवळपास अशक्य झाले होते. पंतने 35 चेंडूत 44 धावा केल्या आणि तो आऊट होताच दिल्ली कॅपिटल्स संघ 199 धावा करून सर्वबाद झाला. यासह हैदराबादने हा सामना 67 धावांनी जिंकला आहे.


संबंधित बातम्या:


ट्रॅव्हिस हेडची पत्नीची पुन्हा एकदा रंगली चर्चा; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ, पाहा Photo


कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video


MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!