RCB vs KKR, IPL 2023 Live: कोलकात्याचा आरसीबीवर 21 धावांनी विजय

RCB vs KKR : लागोपाठ चार पराभवाचा सामना करणारा कोलकाता आणि विजयावर आरुढ असणारा आरसीबी यांच्यामध्ये आज लढत होणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 26 Apr 2023 11:11 PM
कोलकात्याचा आरसीबीवर 21 धावांनी विजय

कोलकात्याचा आरसीबीवर 21 धावांनी विजय

आरसीबीला आठवा धक्का, दिनेश कार्तिक बाद

आरसीबीला आठवा धक्का, दिनेश कार्तिक बाद

आरसीबीला सातवा धक्का

आरसीबीला सातवा धक्का, हसरंगा बाद

आरसीबीला मोठा धक्का, विराट कोहली बाद

आरसीबीला मोठा धक्का, विराट कोहली बाद झाला आहे.  ३७ चेंडूत विराट कोहली ५४ धावांवर बाद झालाय.

आरसीबीला चौथा धक्का, लोमरोर बाद

आरसीबीला चौथा धक्का, लोमरोर बाद झाला.. १८ चेंडूत ३४ धावांची खेळी करत लोमरोर बाद झाला.. वरुण चक्रवर्तीने केले बाद

विराट कोहलीचे दमदार अर्धशतक

विराट कोहलीचे दमदार अर्धशतक

आरसीबीला मोठा धक्का, मॅक्सवेल बाद

आरसीबीला मोठा धक्का, मॅक्सवेल बाद

आरसीबीला दुसरा धक्का, शाहबाज बाद

आरसीबीला दुसरा धक्का, शाहबाज बाद

आरसीबीला पहिला धक्का, फाफ तंबूत

आरसीबीला पहिला धक्का, फाफ तंबूत परतलाय... फाफ १७ धावांवर बाद झाला

आरसीबीची गोलंदाजी कशी ?

आरसीबीकडून वानंदु हसरंगाने सर्वात भेदक मारा केला. हसरंगा याने चार षटकात २४ धावा खर्च करत दोन फलंदाजांना तंबूत धाडले. हसरंगा याने एकाच षटकात नीतीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांना तंबूत धाडले. विजयकुमार वैशाक यानेही चार षटकात ४१ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली. इतर गोलंदाजांची विकेटची पाटी कोरीच राहिली.

आरसीबीची खराब फिल्डिंग - 

आरसीबीच्या फिल्डर्सनी खराब क्षेत्ररक्षण केले. एकेरी दुहेरी धावा दिल्याच पण झेलही सोडले. कोलकात्याचा कर्णधार नीतीश राणा याचे सुरुवातीलाच दोन झेल सोडले. मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनी राणाचे झेल सोडले. याचा फायदा नीतीश राणा याने उचलला. नीतीश राणा याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. राणा याने ४८ धावांची खेळी केली.

रिंकूची फटकेबीजी - 

अखेरच्या दोन षटकात रिंकू सिंह आणि डिव विसे यांनी फटकेबाजी करत कोलकात्याची धावसंख्या २०० पर्यंत पोहचवली. रिंकू सिंह याने १० चेंडूत १८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एख षटकार आणि दोन चौकार लगावले. तर डेविड विझे याने अखेरच्या षटकात तीन चेंडूत दोन षटकारासह १२ धावा चोपल्या.  आंद्रे रसेल याला फटकेबाजी करण्यात अपयश आले. तो एका धावेवर त्रिफाळाचीत बाद झाला.

राणा-अय्यरची दमदार भागिदारी - 

कर्णधार नीतीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांनी कोलकात्याची धावसंख्या झटपट वाढवली. दोघांनी ४४ चेंडूत ८० धावांची भागिदारी केली. दोघांनी चौकार आि षटकारांचा पाऊस पाडला. नीतीश राणा याने २१ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. या खेळीत राणा याने चार षटकार आणि तीन चौकार लगावले. वेंकटेश अय्यर याने २६ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. या छोचेखानी खेळीत अय्यर याने तीन चौकार लगावले.  राणा आणि अय्यर यांच्या खेळीमुळे कोलकाता संघ १७० च्या पार गेला.

कोलकात्याची दमदार सलामी -

जेसन रॉय आणि एन जगदीशन या जोडीने कोलकात्याला दमदार सलामी दिली. जगदीशन याने संयमी फलंदाजी केली तर जेसन रॉय याने आक्रमक रुप धारण केले होते. जेसन रॉय आणि जगदीशन यांनी ९.२ षटकात ८३ धावांची सलामी दिली. यंदाच्या आयपीएलमधील कोलकात्याची ही सर्वात मोठी भागिदारी होय.. पावरप्लेमध्ये या दोन्ही फलंदाजांनी सहा षटकात ६६ धावा केल्या होत्या. याआधीच्या सात सामन्यात पावरप्लेमध्ये कोलकात्याच्या सरासरी दोन विकेट पडल्या आहेत. पहिल्यांदाच कोलकात्याने पावरप्लेमध्ये एकही विकेट गमावली नाही. जेसन रॉय याने अर्धशतकी खेळी केली त जगदीशन याने २७ धावांचे योगदान दिले. 

जेसन रॉय याची अर्धशतकी खेळी - 

सलामी फलंदाज जेसन रॉय याने सुरुवातीपासूनच आक्रमक रुप धारण केले होते. जेसन रॉय याने २९ चेंडूत ५६ धावांचे योगदान दिलेय. या खेळीत जेसन रॉय याने पाच षटकार आणि चार चौकार लगावले. विजयकुमार वैशाक याने जेसन रॉय याला यॉर्करवर क्लीनबोल्ड केले. जेसन रॉय याने शाहबाज याच्या एकाच षटकात चार षटकार मारले होते. जेसन रॉय याने कोलकात्याच्या धावसंख्येला आकार दिला. जेसन रॉ याने वादळी फलंदाजी केली. जेसन रॉय याला जगदीशन याने चांगली साथ दिली. संयमी फलंदाजी करणाऱ्या जगदीशन याने २७ धावांचे योगदान दिले. जगदीशन याने या खेळीत चार चौकार लगावले.

आरसीबीला विजयासाठी २०१ धावांची गरज

IPL 2023, RCB vs KKR: जेसन रॉय याचे दमदार अर्धशतक आणि नीतीश राणा याची कर्णधाराला साजेशी फलंदाजीच्या जोरावर कोलकाताने निर्धारित २० षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात २०० धावांपर्यंत मजल मारली. हसरंगा आणि वैशाक यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. डेविड विसे आणि रिंकू सिंह यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी केल्यामुळे कोलकात्याचा संघ २०० धावांपर्यंत पोहचू शकला. आरसीबीला विजयासाठी २०१ धावांचे आव्हान दिलेय. 

कोलकात्याची २०० धावापर्यंत मजल

कोलकात्याची २०० धावापर्यंत मजल

आंद्रे रसेल त्रिफाळाचीत बाद, सिराजचा भेदक मारा

आंद्रे रसेल त्रिफाळाचीत बाद, सिराजचा भेदक मारा

वानंदु हसरंगा याने एकाच षटकात दोन फलंदाजांना केले बाद

वानंदु हसरंगा याने एकाच षटकात दोन फलंदाजांना बाद केले. राणा आणि अय्यर यांना हसरंगा याने बाद केले. हसरंगा याने चार षटकात २४ धावांच्या मोबद्लयात दोन विकेट घेतल्या.

वेंकटेश अय्यर बाद, कोलकात्याला चौथा धक्का

वेंकटेश अय्यर बाद, कोलकात्याला चौथा धक्का

नीतीश राणा बाद, कोलकात्याला तिसरा धक्का

नीतीश राणा बाद, कोलकात्याला तिसरा धक्का

नीतीश राणाला दुसऱ्यांदा जीवदान

नीतीश राणाला दुसऱ्यांदा जीवदान मिळाले.. हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी झेल सोडले

कोलकात्याला मोठा धक्का, अर्धशतकानंतर जेसन रॉय बाद

कोलकात्याला मोठा धक्का, अर्धशतकानंतर जेसन रॉय बाद

कोलकात्याला पहिला धक्का, जगदीशन बाद

कोलकात्याला पहिला धक्का, जगदीशन बाद झाला.. विजयकुमार वैशाख याने जगदीशन याला २७ धावांवर बाद झालाय.

जेसन रॉय याचे दमदार अर्धशतक

जेसन रॉय याचे दमदार अर्धशतक...  २२ चेंडत झळकावले अर्धशतक

जेसन रॉयची दमदार फलंदाजी, एकाच षटकात लगावले चार षटकार

जेसन रॉयची दमदार फलंदाजी, एकाच षटकात लगावले चार षटकार

सहा षटकानंतर कोलकात्याने बिनबाद ६६ धावा केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्लेईंग इलेव्हन

- विराट कोहली (कर्णधार), शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदु हसरंगा, डेविड विली, विजयकुमार वैशाक, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.  

कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग इलेव्हन- 

एन जगदीसन (विकेटकीपर), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेविड विसे, वैभव अरोरा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती. 

सिराज-जगदीशनची संयमी सुरुवात

सिराज-जगदीशनची  संयमी सुरुवात

आरसीबीने नाणेफेक जिंकली

विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

M. Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल

आज संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होतो, असे आकडेवारीवरुन दिसतेय.  

हेड टू हेड काय स्थिती ? -

कोलकाता आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत काटें की टक्कर पाहायला मिळाली आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरने आरसीबीचा दारुण पराभव केला होता. कोलकात्याच्या फिरकी गोलंदाजांपुढे आरसीबीची फलंदाजी ढेपाळली होती. हा सामना कोलकात्याने जिंकला होता. पण आता बेंगलोरच्या मैदानावर आरसीबी पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

आयपीएलमध्ये कोलकाता आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत 31 सामने  झाले आहेत. यामध्ये कोलकाता संगाचे पारडे थोडे जड दिसतेय. कोलकाता संघाने आतापर्यंत 17 सामन्यात बाजी मारली आहे. तर आरसीबीने संघाने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघ विजयासाठी आज मैदानात उतरणार आहेत. 

सिराजला गोलंदाजांची चांगली साथ - 

मोहम्मद सिराज करिअरच्या सर्वोत्तम फॉर्मात आहे. सिराज याने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. सिराज याला पार्नेल, हर्षल पटेल आणि डेवि विली यांनी चांगली साथ दिली आहे. त्याशिवाय वानंदु हसरंगाही आता हळू हळू लयीत येताना दिसत आहे. वैशाक विजय कुमार धावांची लयलूट करतोय.. हे आरसीबीसमोर सर्वात मोठे आव्हान असेल. त्याशिवाय आज होणाऱ्या सामन्यात जोश हेलवूड खेळण्याची शक्यता आहे. असे झाले तर जगातील दोन आघाडीचे गोलंदाज आरसीबीची धुरा सांभाळतील... 

आरसीबीपुढे काय आव्हाने - 

फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीने आतापर्यंत सात सामन्यात चार विजय मिळवले आहेत.  आठ गुणांसह आरसीबी पाचव्या स्थानावर आहे. ग्लेन मॅक्सवेल, विराट आणि फाफ यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना अद्याप छाप सोडता आली नाही. दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर यांच्यासह इतर फलंदाजांची बॅट अद्याप शांत आहे. प्रमुख तीन फलंदाज लवकर बाद झाले तर आरसीबीची फलंदाजी ढेपाळते.. हे प्रत्येक सामन्यात दिसून आलेय. मध्यक्रम फलंदाजांना जबाबदारी घेऊन धावा कराव्या लागणार आहेत.  

रसेलचा फ्लॉप शो - 

आतापर्यंत आंद्रे रसेल लयीत दिसला नाही. गोलंदाजी आणि फलंदाजीत रसेल फ्लॉप जातोय. त्याची फिटनेसही कोलकात्याची डोकेदुखी वाढवणारी आहे. आतापर्यंत रसेल याला एकाही सामन्यात चार षटके गोलंदाजी करता आलेली नाही. कोलकात्याने आरसीबीचा 81 धावांनी पराभव केला होता.. हीच काय ती नीतीश राणा आणि टीमसाठी जमेची बाजू आहे. पण आता सामना आरसीबीच्या मैदानावर आहे. आरसीबीने तगड्या राजस्थानचा पराभव करत प्रतिस्पर्धी संघाला इशाराच दिलाय. विराट कोहली, फाफ आणि ग्लेन मॅक्सवेल भन्नाट फॉर्मात आहेत. 

कोलकात्याला अद्याप सलामी मिळाली नाही - 

आयपीएलचा अर्धा हंगाम झाला आहे... पण कोलकात्याला अद्याप सलामी जोडी मिळालेली नाही. वेंकटेश अय्यर, सुनील नारायण, जगदीशन, लिटन दास, जेसन रॉय आणि रहमानुल्लाह गुरबाज यांना सालमीसाठी वापरण्यात आले. पण एकाही फलंदालाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. चांगली सुरुवात न मिळणे... हे कोलकात्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय. 

कोलकाताच्या फलंदाजांची खराब कामगिरी -  

फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फटका कोलकाता संघाला बसला आहे. नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शाकिब अल हसन या दोन अनुभवी खेळाडूंची कमी कोलकात्याला जाणवत आहे. चेन्नईविरोधात कोलकात्याच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. फलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नांगी टाकली.  वेंकटेश अय्यर,  नितीश राणा, एन जगदीशन, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यासारख्या फलंदाजांनी विकेट फेकल्या.  

पार्श्वभूमी

RCB vs KKR, IPL 2023 : लागोपाठ चार पराभवाचा सामना करणारा कोलकाता आणि विजयावर आरुढ असणारा आरसीबी यांच्यामध्ये आज लढत होणार आहे. कोलकाताने घरच्या मैदानावर आरसीबीचा दारुण पराभव केला होता.. आरसीबी आता आपल्या घरच्या मैदानावर परभवाची परतफेड करणार का?  दोन वेळा आयपीएल चषक उंचावणाऱ्या कोलकाता संघाला सात सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आले आहेत. कोलकाता संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. कोलकात्यासमोर आरसीबीचे तगडे आव्हान असणार आहे. अर्धा आयपीएल हंगाम संपत आला पण कोलकात्याला अद्याप प्लेईंग 11 मिळालेली नाही. प्रत्येक सामन्यात कोलकाता संघात नवीन खेळाडू दिसत आहेत. हेच कोलकात्यासमोर मोठं आव्हान असेल. दुसरीकडे आरसीबीची लोअर ऑर्डर फलंदाजी फ्लॉप होत आहे... मॅक्सवेल, फाफ आणि विराट कोहली या तीन खेळाडूंसोबतच आरसीबीची फलंदाजी आहे. इतर फलंदाजांना दर्जेदार कामगिरी करावी लागेल. 
 
कोलकाताच्या फलंदाजांची खराब कामगिरी -  

फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फटका कोलकाता संघाला बसला आहे. नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शाकिब अल हसन या दोन अनुभवी खेळाडूंची कमी कोलकात्याला जाणवत आहे. चेन्नईविरोधात कोलकात्याच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. फलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नांगी टाकली.  वेंकटेश अय्यर,  नितीश राणा, एन जगदीशन, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यासारख्या फलंदाजांनी विकेट फेकल्या.  

कोलकात्याला अद्याप सलामी मिळाली नाही - 

आयपीएलचा अर्धा हंगाम झाला आहे... पण कोलकात्याला अद्याप सलामी जोडी मिळालेली नाही. वेंकटेश अय्यर, सुनील नारायण, जगदीशन, लिटन दास, जेसन रॉय आणि रहमानुल्लाह गुरबाज यांना सालमीसाठी वापरण्यात आले. पण एकाही फलंदालाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. चांगली सुरुवात न मिळणे... हे कोलकात्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय. 

रसेलचा फ्लॉप शो - 

आतापर्यंत आंद्रे रसेल लयीत दिसला नाही. गोलंदाजी आणि फलंदाजीत रसेल फ्लॉप जातोय. त्याची फिटनेसही कोलकात्याची डोकेदुखी वाढवणारी आहे. आतापर्यंत रसेल याला एकाही सामन्यात चार षटके गोलंदाजी करता आलेली नाही. कोलकात्याने आरसीबीचा 81 धावांनी पराभव केला होता.. हीच काय ती नीतीश राणा आणि टीमसाठी जमेची बाजू आहे. पण आता सामना आरसीबीच्या मैदानावर आहे. आरसीबीने तगड्या राजस्थानचा पराभव करत प्रतिस्पर्धी संघाला इशाराच दिलाय. विराट कोहली, फाफ आणि ग्लेन मॅक्सवेल भन्नाट फॉर्मात आहेत. 

आरसीबीपुढे काय आव्हाने - 

फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीने आतापर्यंत सात सामन्यात चार विजय मिळवले आहेत.  आठ गुणांसह आरसीबी पाचव्या स्थानावर आहे. ग्लेन मॅक्सवेल, विराट आणि फाफ यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना अद्याप छाप सोडता आली नाही. दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर यांच्यासह इतर फलंदाजांची बॅट अद्याप शांत आहे. प्रमुख तीन फलंदाज लवकर बाद झाले तर आरसीबीची फलंदाजी ढेपाळते.. हे प्रत्येक सामन्यात दिसून आलेय. मध्यक्रम फलंदाजांना जबाबदारी घेऊन धावा कराव्या लागणार आहेत.  
 
सिराजला गोलंदाजांची चांगली साथ - 

मोहम्मद सिराज करिअरच्या सर्वोत्तम फॉर्मात आहे. सिराज याने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. सिराज याला पार्नेल, हर्षल पटेल आणि डेवि विली यांनी चांगली साथ दिली आहे. त्याशिवाय वानंदु हसरंगाही आता हळू हळू लयीत येताना दिसत आहे. वैशाक विजय कुमार धावांची लयलूट करतोय.. हे आरसीबीसमोर सर्वात मोठे आव्हान असेल. त्याशिवाय आज होणाऱ्या सामन्यात जोश हेलवूड खेळण्याची शक्यता आहे. असे झाले तर जगातील दोन आघाडीचे गोलंदाज आरसीबीची धुरा सांभाळतील... 

हेड टू हेड काय स्थिती ? -

कोलकाता आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत काटें की टक्कर पाहायला मिळाली आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरने आरसीबीचा दारुण पराभव केला होता. कोलकात्याच्या फिरकी गोलंदाजांपुढे आरसीबीची फलंदाजी ढेपाळली होती. हा सामना कोलकात्याने जिंकला होता. पण आता बेंगलोरच्या मैदानावर आरसीबी पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

आयपीएलमध्ये कोलकाता आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत 31 सामने  झाले आहेत. यामध्ये कोलकाता संगाचे पारडे थोडे जड दिसतेय. कोलकाता संघाने आतापर्यंत 17 सामन्यात बाजी मारली आहे. तर आरसीबीने संघाने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघ विजयासाठी आज मैदानात उतरणार आहेत. 

M. Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल
आज संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होतो, असे आकडेवारीवरुन दिसतेय.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.