Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आपल्या सुरुवातीच्या पराभवातून पुनरागमन करू पाहत असताना, आज सर्वांच्या नजरा ईडन गार्डन्सवर असतील. आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये नववा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सला पंजाब किंग्ज विरुद्ध डीएलएस पद्धतीनुसार सात धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तर रॉयल चॅलेंजर्स् बंगळुरुने विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सवर आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. आज कोलकाता आणि बंगळुरु यांच्यातील सामना कोलकातामधील मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. 


IPL 2023,RCB vs KKR : कोलकाता खातं उघडणार की आरसीबी बाजी मारणार?


इंडियन प्रीमियर लीगचा नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघ तब्बल चार वर्षांनंतर त्यांच्या घरच्या मैदानावर परतणार आहे. अशा परिस्थितीत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे केकेआरच्या संघाचा समतोल बिघडला आहे. यामुळे ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याकडे कोलकाताच्या चाहत्यांचं विशेष लक्ष असेल. दुसरीकडे, अनेक स्टार खेळाडूं असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ आपला पहिला सामना जिंकल्यामुळे  चुरशी लढतीस तयार आहे. 


Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?


आज आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.


RCB vs KKR Probable Playing XI : आरसीबी विरुद्ध कोलकाता संभाव्य प्लेईंग 11


RCB Playing XI : आरसीबी संभाव्य प्लेईंग 11


फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, डीजे विली, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आकाश दीप, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, कर्ण शर्मा


KKR Playing XI : कोलकाता संभाव्य प्लेईंग 11


रिंकू सिंह, नितीश राणा (कर्णधार), वॉरियर, जेसन रॉय, आदि रसेल, सुनिल नारायण, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव


लाईव्ह सामना कुठे पाहाल?


स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Points Table : रोमाचंक लढतीत पंजाबचा विजय, पराभवानंतर गुणतालिकेत राजस्थानचं स्थान काय? जाणून घ्या...