Virat Kohli Strike Rate Record in IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) पाचव्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) आठ विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला विराट कोहली (Virat Kohli). बंगळुरुकडून कोहलीनं झंझावाती अर्धशतकं ठोकत 82 धावांची नाबाद खेळी केली. बंगळुरुच्या घरच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळताना कोहलीचा धमाका पाहायला मिळाला. आरसीबीच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलत कोहलीने आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली.


Virat Kohli in IPL 2023 : कोहलीनं मोडला रोहित शर्माचा विक्रम


या सोबतच आयपीएलमध्ये विराट कोहलीने रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला आहे. विराटने मुंबईविरुद्धच्या सामन्यात 82 धावांची झंझावाती खेळी केली. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने 150 प्लसच्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केली. अशाप्रकारे कोहलीने 23 व्या वेळा अर्धशतकं ठोकलं आहे.


Virat Kohli in IPL 2023 : आयपीएलमध्ये 'ही' कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू


रविवारच्या तुफान खेळीसह विराट कोहलीने 150 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने 23 अर्धशतकं झळकावली आहेत. आतापर्यंत हा विक्रम भारतासाठी रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने आयपीएलमध्ये 22 वेळा 150 प्लसच्या स्ट्राईक रेटने अर्धशतकं झळकावली आहेत. या यादीत तिसरं नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे, ज्याने हा पराक्रम 19 वेळा केला आहे, तर सुरेश रैनानेही आयपीएलमध्ये 19 वेळा झंझावाती अर्धशतक पूर्ण केले आहे.


Virat Kohli in IPL 2023 : रविवारचा दिवस विराट कोहलीसाठी 'सुपर संडे'


रविवारचा दिवस विराट कोहलीने 'सुपर संडे'मध्ये बदलला. कोहलीने मुंबई इंडियन्सविरुद्ध 49 चेंडूंत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची तुफानी खेळी केली. यावेळी विराटचा स्ट्राइक रेट 167 पेक्षा जास्त होता. सामन्यातील विजयी षटकार देखील विराट कोहलीच्या बॅटमधून आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) आठ विकेट्सने जिंकला. (Virat Kohli Broke Rohit Sharma's Record)


Virat Kohli in IPL 2023 : बंगळुरुचा मुंबईवर 8 विकेट्सने विजय


विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने मुंबईचा 8 विकेटने पराभव केला. सलामीसाठी उतरलेल्या कोहली आणि डु प्लेसिसने 148 धावांची मोठी भागीदारी केली. मुंबईने दिलेले 172 धावांचे आव्हान आरसीबीने 22 चेंडू आणि 8 विकेट राखून पार केले. मुंबईचा पराभव करत आरसीबीने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजायाने केली. तर मुंबईने नेहमीप्रमाणे पहिला सामना गमावला आहे. 2013 पासून मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


MI vs RCB, IPL 2023 : 'रन मशीन'चा धमाका! कोहलीची 'विराट' खेळी, रोहित शर्माकडूनही कौतुक