Wayne Parnell is Reece Topley's Replacement : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (Royal Challengers Bangalore) ताफ्यात नवा गडी दाखल झाला आहे. दुखापतग्रस्त रीस टॉपलेच्या (Reece Topley) जागी आरसीबीने दक्षिण आफ्रिकेच्या (South African Cricketer) अष्टपैलू खेळाडूला संधी दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) रीस टॉपलीच्या जागी  दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वेन पार्नेलला (Wayne Parnell) संघात सामील केलं आहे. रीस टॉपली दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे.


IPL 2023 RCB : रीस टॉपलेच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडूला संधी


आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीला (RCB) मोठा धक्का बसला होता. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा स्टार गोलंदाज रीस टॉपलीच्या खांद्याला दुखापती झाली होती. त्यानंतर तो आयपीएल 2023 मधून बाहेर पडला. घेतला. आठव्या षटकात तिलक वर्माचा चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात रीस टोप्ली याच्या खांद्याला दुखापत झाली.


IPL 2023 RCB : दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा गोलंदाज आरसीबीच्या संघात


आता, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान डावखुरा गोलंदाज वेन पार्नेलला आयपीएल 2023 (IPL 2023) साठी जखमी रीस टॉपलीच्या जागी करारबद्ध केलं आहे. ClubCricketSA च्या रिपोर्टनुसार, वेन पार्नेल लवकरच संघात सामील होण्याची शक्यता आहे आणि आरसीबीच्या पुढील सामन्यांमध्ये खेळासाठी उपलब्ध असेल. आरसीबीचा गोलंदाज रीस टॉपली खांद्याच्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर पडला. मुंबई इंडियन्सविरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या घरच्या सामन्यात टॉपलीला दुखापत झाली होती.






RCB Wayne Parnell : वेन पार्नेल आरसीबीच्या ताफ्यात


वेन पार्नेलही दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएलच्या लिलावात पार्नेल ची किंमत 75 लाख रुपये होती. पण तो लिलावात विकला गेला नव्हता. वेन पार्नेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 26 सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 63 धावा आणि 26 विकेट घेतल्या आहेत. पार्नेलने त्याच्या कारकिर्दीत फारशी फलंदाजी केलेली नाही पण, त्याने मोजके चांगले षटकार ठोकले आहेत. यासोबतच त्याला विकेट घेण्याची कला चांगलीच अवगत आहे. (IPL 2023, RCB Reece Topley's Replacement Wayne Parnell )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Injured Premier League : आयपीएलला दुखापतीचे ग्रहण, कोणत्या संघातील कोणता खेळाडू दुखापतीमुळे 'Out'