Virat Kohli and Shah Rukh Khan Interaction after Match : आयपीएलमध्ये (IPL 2023) कोलकाताच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Garden Cricket Stadium) मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये गुरुवारी पहिला विजय मिळवत खातं उघडलं. कोलकाताने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) 81 धावांनी दारुण पराभव केला. यावेळी संघाचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळाला. दरम्यान, सामना संपल्यानंतर शाहरुख खान आणि विराट कोहली यांनी एकमेकांची भेट घेतली. यावेळी शाहरुख खानने कोहलीला मिठी मारली हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


IPL 2023, KKR vs RCB : शाहरुख खानने विराट कोहलीला मारली मिठी


कोलकाता आणि आरसीबी यांच्यातील सामना संपल्यानंतर केकेआर संघाचा मालक शाहरुख खानने मैदानावर खेळाडूंची भेट घेतली. यावेळी शाहरुखने विरुद्ध संघाचा खेळाडू विराट कोहली याचीही भेट घेतली. यावेळी शाहरुख खानने विराट कोहलीला कडकडून मिठी मारली एवढंच नाही तर त्याचा गालही ओढला. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून व्हायरल होत आहेत.


Shah Rukh Khan Hugs Virat Kohli : पाहा व्हायरल फोटो आणि व्हिडीओ


















 


IPL 2023, RCB vs KKR : कोलकाताकडून आरसीबीचा दारुण पराभव


आयपीएलमध्ये गुरुवारी केकेआरने आरसीबीचा 81 धावांनी दारुण पराभव केला. यावेळी संघाचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळाला. केकेआरने आरसीबीचा पराभव करून गुणतालिकेत खातं उघडलं. 205 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ केवळ 123 धावांवर बाद झाला. गोलंदाज सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांनी आरसीबीच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. शार्दुल ठाकूरच्या झंझावाती अर्धशतकामुळे पहिल्या डावात केकेआरने 20 षटकांत सात गडी गमावून 204 धावा केल्या. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rinku Singh, IPL 2023 : नववी नापास, मात्र क्रिकेटमध्ये नेहमीच फुल्ल मार्क्स; शार्दुलसोबत KKR साठी धावांचा डोंगर रचणारा रिंकू सिंह नेमका कोण?