Indian Premier League 2023, RCB : आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. आरसीबाचा वेगवान गोलंदाज रीस टोप्ली दुखापतग्रस्त झाला आहे. फिल्डिंग करताना रीस टोप्ली याच्या खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर होती, त्यामुळे रीस टोप्ली याला मैदानाबाहेर जावे लागले. रीस टोप्ली याच्यावर फिजिओ उपचार करत आहेत. रीस टोप्ली याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. याआधीच दुखापतीमुळे गुजरातला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे केन विल्यमसन संपूर्ण आयपीएलला मुकला आहे. आता आरसीबीच्या प्रमुख गोलंदाजाला दुखापत झाली आहे. 


आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्ऱथण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आठव्या षटकात तिलक वर्माचा चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात रीस टोप्ली याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. सामन्यात तो गोलंदाजी करु शकेल की नाही... याबाबत साशंकता आहे. दुखापत झाल्यानंतर टोप्लीला वेदना झाल्याचे दिसत होते. काही वेळानंतर त्याला मैदानाबाहेर नेहणयात आले. फिजोओ त्याच्यावर उपचार करत आहेत. रीस टोप्ली याने दोन षटके गोलंदाजी केली होती. या दोन षटकात टोप्ली याने 14 धावा खर्च करत एक विकेट घेतली होती. रीस टोप्ली याने धोकादायक कॅमरुन ग्रीन याचा अडथळा दूर केला होता. रीस टोप्लीला दुखापत झाल्यानंतर आरसीबीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, जोश हेजलवूड याआधीच दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकणार आहे. त्यात आता आणखी एका गोलंदाजाला दुखापत झाली आहे. 





















 आरसीबीच्या गोलंदाजाचा भेदक मारा - 


नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. पावरप्लेसमध्ये मुंबईच्या तीन खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. मुंबईला पावरप्लेमध्ये फक्त 29 धावा करता आल्या. यामध्ये त्यांनी कॅमरुन ग्रीन, ईशान किशन आणि रोहित शर्माची विकेट गमावली. मोहम्मद सिराज याने तीन षटकात अवघ्या पाच धावा खर्च करत एक विकेट घेतली.