RCB Playoff Scenario IPL 2024 : आयपीएल 2024 आता हळूहळू उत्तारार्धाकडे झुकत आहे. लवकरच प्लेऑफचे संघ (IPL Playoff Scenario) समोर येतील. हैदराबाद(SRH), राजस्थान (RR) आणि कोलकाता (KKR) हे संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. तर आरसीबीचा (RCB) संघ एकदम तळाशी आहे. आरसीबीला आठ सामन्यात फक्त एक विजय मिळवता आलाय. सात पराभव झालेल्या आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचणं सध्या कठीण दिसतेय, पण अशक्य नाही. अजूनही आरसीबीला प्लेऑफमध्ये (RCB Playoff Chances) पोहचण्याची संधी आहे.
यंदाच्या हंगामात आरसीबीची कामगिरी अतिशय खराब झाली. आरसीबीला फक्त पंजाब किंग्सविरोधातच विजय मिळवता आला. आरसीबीने आठ सामन्यातील सात सामने गमावले आहेत. आरसीबीचं यंदाच्या हंगामातील आव्हान आता कठीण झालेय. त्यांना प्लेऑफमध्ये पोहचण्याची अद्याप संधी आहे, पण त्यासाठी त्यांना नशीबाचीही साथ लागेल. दोन गुणांसह आरसीबीचा संघ दहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.
आरसीबीसाठी प्रत्येक सामना करो या मरो -
गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या आरसीबीसाठी आता प्रत्येक सामना करो या मरो असाच आहे. एकाही सामन्यात पराभव झाल्यास आरसीबीचं आयपीएल 2024 चं आव्हान संपुष्टात येईल. आरसीबीने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. यामध्ये फक्त एकच विजय मिळवता आलाय. आरसीबीनं सलग सहा सामने गमावण्याचा लाजीरवाणा विक्रमही नावावर केला आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामन्यात विजय मिळवावा लागेल. आरसीबीला उर्वरित सहा सामनेही मोठ्या फरकानं जिंकावे लागतील. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीकडे 14 गुण असावे लागतील, त्याशिवाय नेटरनरेटही तगडा हवा आहे. आता आरसीबीकडे फक्त दोन गुण आहेत. आरसीबीचे सहा सामने शिल्लक आहेत. या सहाही सामन्यात आरसीबीला मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल. आरसीबीनं सहा सामने जिंकले तरीही प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. त्यामुळे आजपासून आरसीबीची करो या मरो अशी स्थिती सुरु झाली.आज आरसीबीचा सामना फॉर्मात असलेल्या हैदराबादविरोधात होत आहे. करो या मरो सामन्यात आरसीबी कशी कामगिरी करतेय?? याकडे क्रीडा चाहत्यांचं लक्ष लागलेय.
मुंबईची स्थितीही कठीण -
आयपीएल 2024 मध्येही मुंबईची कामगिरी साधारण राहिली आहे. मुंबईला आठ सामन्यात फक्त तीन विजय मिळवता आलेत. मुंबईकडे सहा गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी मुंबईला उर्वरित सहा सामन्यात विजय मिळवावा लागेल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईचा संघ यंदा प्लेऑफसाठी पात्र ठरणार का? हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईलच.
आणखी वाचा :
मोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज