IPL 2023, MI vs GT: वानखेडे मैदानावर मुंबईने गुजरातचा २७ धावांनी पराभव केला. मुंबईने दिलेल्या २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघाने १९१ धावांपर्यंत मजल मारली. गुजरातकडून एकट्या राशिद खान याने झुंज दिली. राशिद खान याने गोलंदाजीत चार विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजी करताना नाबाद ७९ धावांची खेळी केली. राशिद खान एकटा मुंबईच्या संघाला नडला... राशिदच्या वादळी खेळीपुढे सूर्यकुमार यादवाची खेळीही फिकी पडली, असे म्हटल्यास वावगे वाटायला नको. राशिद खान याने आपल्या खेळीत तब्बल दहा षटकार लगावले...राशिद याच्या खेळीमुळे मुंबईच मोठ्या विजयाच्या मनसुब्यावर पाणी फेरले.. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला राशिद खानला बाद करता आले नाही. २४ वर्षीय राशिद खान याचे हे आयपीएलमधील पहिले अर्धशतक होय. 


राशिद खान याने अल्जारी जोसेफ याला हाताशी धरत गुजरातचा मोठा पराभव टाळला. राशिद खान याने ३२ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दहा षटकार लगावले.. त्याशिवाय तीन चौकारही मारले.. राशिद खान याने अल्जारी जोसेफ याच्यासोबत ४० चेंडूत ८८ धावांची भागिदारी केली. नवव्या विकेटसाठी या दोघांनी तब्बल ८८ धावा जोडल्या.  यामध्ये राशिद खान याचे योगदान ७७ धावांचे होते. तर अल्जारी जोसेफ सात धावांचे योगदान होते. राशिद खान याच्या वादळी खेळीमुळे गुजरातचा मोठा पराभव टळला. 


राशिदचा गोलंदाजीत करिष्मा  - 
वानखेडे मैदानावर राशिद खान याने भेदक गोलंदाजी केली. राशिद खान याने अघ्या चार षटकात ३० धावांच्या मोबद्लयात चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. राशिद खान याने मुंबईच्य सलामी फलंदाजांना तंबूत पाठवले. रशिद खान याने रोहित शर्मा, ईशान किशन, नेहल वढेरा आणि टिम डेविड यांना तंबूत पाठवले. 24 वर्षीय राशिद सध्या दमदार फॉर्मात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये राशिदच्या नावावर २३ विकेट झाल्या आहेत. राशिदने विकेटचा चौकार लगावत पर्पल कॅपवर नाव कोरलेय. युजवेंद्र चहल याला मागे टाकत राशिदने पर्पल कॅफवर नाव कोरले.