India A vs England Lions: इंग्लंडमध्ये भारत अ आणि इंग्लंड लायन्स (India A vs England Lions) यांच्यात दुसरा अनौपचारिक कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात सध्या भारतीय संघाकडे 184 धावांची आघाडी आहे. भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमदच्या आक्रमक माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ गडगडल्याचे पाहायला मिळाले. 

नॉर्थम्प्टन येथील काउंटी ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या या अनौपचारिक कसोटी सामन्यात, खलील अहमदने सुरुवातीच्या सत्रातच इंग्लंड लायन्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. खलील अहमद हॅटट्रिकपासून हुकला असला तरी, खलीलने त्याच्या भेदक गोलंदाजीने एकूण 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. खलील अहमदने प्रथम 51 व्या षटकात जॉर्डन कॉक्सला झेलबाद केले. त्यानंतर, 55 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर, त्याने जेम्स र्यूला झेलबाद केले आणि नंतर पुढच्याच चेंडूवर, जॉर्ज हिलला बाद करत पॅव्हेलियनमध्ये पाठवून हॅट्रिकच्या जवळ पोहोचला. मात्र तिसऱ्या चेंडूवर, ख्रिस वोक्सने खलील अहमदला हॅट्रिक घेण्यापासून रोखले. त्यानंतर 57 व्या षटकात ख्रिस वोक्सला बाद करून खलील अहमदने चौथी विकेट घेतली. 

इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघात खलील अहमदला संधी नाही-

खलील अहमदचा उत्कृष्ट फॉर्म असूनही, इंग्लंड कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या भारताच्या संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. निवडकर्त्यांनी या मालिकेसाठी एकमेव डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंगचा संघात समावेश केला आहे. इंग्लंड लायन्सविरुद्ध खलील अहमदच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तो भारतीय संघात पुनरागमनाचा प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत सामना कसा राहिला?

करीत इंग्लंड लॉयन्सला चार दिवसांच्या अनधिकृत कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रविवारी 89 षटकांत 327 धावांत रोखत 19 धावांची आघाडी घेतली. दिवसअखेर भारताने 33 षटकांत 4 बाद 163 धावा करत 184 धावांची आघाडी घेतली आहे. भारताचे ध्रुव जुरेल (नाबाद 6) आणि नितीश रेड्डी (नाबाद 1) मैदानावर आहेत. लॉयन्सने शनिवारच्या 3 बाद 192 वरून पुढे खेळायला सुरुवात केली.

संबंधित बातमी:

Rinku Singh-Priya Saroj: साखरपुड्याची अंगठी घालताच खासदार प्रिया सरोज नाचल्या; रिंकू सिंह पाहतच बसला, VIDEO

Carlos Alcaraz French Open Final: कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता; तब्बल साडेपाच तासाच्या संघर्षानंतर पाचव्यांदा ग्रँड स्लॅम जेतेपदावर मोहोर