Rinku Singh-Priya Saroj Net Worth: क्रिकेटर रिंकू सिंह की खासदार प्रिया सरोज, कोण जास्त श्रीमंत?; जाणून घ्या दोघांचीही Net Worth
Rinku Singh-Priya Saroj Net Worth: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू खेळाडू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा काल साखरपुडा पार पडला आहे.
Rinku Singh-Priya Saroj Net Worth
1/11
Rinku Singh-Priya Saroj Net Worth: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू खेळाडू रिंकू सिंह (Riku Singh) आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (Priya Saroj) यांचा काल (8 जून) साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्याला दिग्गजांनी हजेरी लावली.
2/11
साखरपुड्याची अंगठी घालताच प्रिया सरोज भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
3/11
दरम्यान, रिंकू आणि प्रिया सरोजच्या या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर येत आहे. यावेळी प्रिया सरोज यांनी डान्स देखील केला. मात्र होणाऱ्या पत्नीला नाचताना रिंकू सिंह पाहतच बसला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
4/11
प्रिया सरोज उत्तर प्रदेशातील मछलीशहरच्या खासदार आहेत. प्रियाचे वडील तुफानी सरोज देखील खासदार राहिले आहेत. खासदार असण्याव्यतिरिक्त, प्रिया व्यवसायाने वकील देखील आहेत.
5/11
प्रिया सरोज सध्या 26 वर्षांच्या आहेत. 2024 मध्ये त्यांनी सपाच्या तिकिटावर उत्तर प्रदेशातील मछलीशहरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी ही निवडणूक जिंकली. प्रिया सरोज यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे फक्त दोन बँक खाती आहेत.
6/11
प्रतिज्ञापत्रानुसार, प्रिया सरोज यांची एकूण संपत्ती सुमारे 11.26 लाख रुपये आहे. यापैकी 75,000 रुपये रोख आहेत. 8719 रुपये कॅनरा बँकेच्या खात्यात आणि 10.10 लाख रुपये युनियन बँकेच्या खात्यात जमा आहेत.
7/11
प्रिया सरोज यांच्याकडे कोणतीही पॉलिसी नाही किंवा त्यांनी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवलेले नाहीत. त्यांच्याकडे कोणतेही बाँड नाहीत किंवा त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नाही. त्यांच्याकडे एलआयसी किंवा इतर कोणतीही विमा पॉलिसी नाही.
8/11
प्रिया सरोज यांच्या नावावर जमीन किंवा घर नाही. इतकेच नाही तर त्यांच्याकडे कोणतेही वाहनही नाही. प्रिया सरोज यांच्याकडे सोन्याचे दागिने आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, खासदार प्रिया सरोज यांच्याकडे 5 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. त्यांची किंमत 32,000 रुपये आहे.
9/11
दुसरीकडे रिंकू सिंग यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर ते प्रिया सरोज यांच्यापेक्षा खूपच जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिंकू सिंगची एकूण संपत्ती सुमारे 18 कोटी रुपये आहे.
10/11
रिंकूने गेल्या वर्षी 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आलिशान घर खरेदी केले होते. रिंकूला आयपीएल 2025 साठी केकेआरकडून 13 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली आहे.
11/11
रिंकू सिंगचा बीसीसीआयच्या सी श्रेणीमध्ये समावेश आहे. या श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 1 कोटी रुपये शुल्क मिळते. क्रिकेटव्यतिरिक्त, रिंकू जाहिरातींमधूनही कमाई करते.
Published at : 09 Jun 2025 09:36 AM (IST)