IPL 2023 Latest Points Table : रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने वानखेडेवर विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने आगेकूच केली आहे. सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीच्या बळावर मुंबईने गुजरातचा सहज पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी कराताना २१८ धावांपर्यंत मजल मारली होती. यात सूर्याने शतकी खेळी केली होती. मुंबईन दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघ १९१ धावांपर्यंत मजल मारू शकला. मुंबईने या सामन्यात २७ धावांनी बाजी मारली. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुंबईचे १४ गुण झाले आहेत.
मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल झालाय. राजस्थानचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरलाय तर मुंबईचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहचलाय. वानखेडेवर पराभव झाल्यानंतरही गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. तर धोनीचा चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे.
मुंबईच्या विजयानंतर गुणतालिकेत काय झाला बदल ?
गुजरातचा संघाने १२ सामन्यात आठ विजय मिळवलेत. गुजरात १६ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर धोनीचा चेन्नईने १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने १२ सामन्यात सात विजय मिळवलेत तर त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला होता.. चेन्नईचे १५ गुण आहेत. मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. मुंबईने १२ सामनयात सात विजय मिळवलेत. राजस्थानचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरलाय. राजस्थानने १२ सामन्यात सहा विजय मिळवत १२ गुणांची कमाई केली आहे. त्याशिाय लखनौचा संघाने ११ सामन्यात ११ गुणांची कमाई केली आहे.
इतर संघाची स्थिती काय ?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांचे प्रत्येकी दहा गुण आहेत. आरसीबी सहाव्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता सातव्या आमि पंजाब आठव्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय सनरायजर्स हैदराबाद 10 सामन्यात सहा पराभव झाले आहेत. आठ गुणांसह ते नवव्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली सात पराभवासह दहाव्या स्थानावर आहे. दिल्ली आणि कोलकाता यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. कोलकात्याचे १२ सामन्यात दहा गुण आहेत. तर दिल्लीचे ११ सामन्यात आठ गुण आहेत.