एक्स्प्लोर

Punjab Kings : कर्णधार बदलले पण पंजाबचं नशीब नाही बदलले

Punjab Kings performance In IPL : यंदाच्या हंगामाआधी मयांग अग्रवालकडे कर्णधारपद सोपवणाऱ्या पंजाबचं नशीब बदलले नाही.... पंजाब संघाचे पुन्हा एकदा साखळी फेरीत आव्हान संपुष्टात आलेय.

Punjab Kings In IPL : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील प्लेऑफचे सामने सुरु झाले आहेत. साखळी सामन्यात सरस कामगिरी करणारे चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. यामध्य गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंटस् आणि आरसीबीचा समावेश आहे. अन्य सहा संघाने आव्हान संपलेले आहे. यंदाच्या हंगामाआधी मयांग अग्रवालकडे कर्णधारपद सोपवणाऱ्या पंजाबचं नशीब बदलले नाही.... पंजाब संघाचे पुन्हा एकदा साखळी फेरीत आव्हान संपुष्टात आलेय...मागील आठ वर्षात पंजाबने फक्त एक वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवलाय... तर आयपीएलच्या इतिहासत पंजाब फक्त दोन वेळा प्लेऑफमध्ये पोहचलाय. 2008 आणि 2014 चा अपवाद वगळता पंजाबला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. 

यंदा दोन खेळाडूंना केले होते रिटेन -  
आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाआधी पंजाबने दोन खेळाडूंना रिटेन केले होते. मयांक अग्रवालला 12 कोटी तर अर्शदीप सिंहला चार कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. अशात लिलावात पंजाबकडे तब्बल 74 कोटी रुपये होते.. पंजाबने नवीन संघ तयार करण्याचा प्रयत्न केला... राहुलच्या जागी मयांक अग्रवालकडे नेतृत्वात सोपवण्यात आले. पण तरीही पंजाबचे नशीब बदलले नाही.. सलग चौथ्या वर्षी पंजाब गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर राहिलाय. 

आयपीएलचा पंजाबचा प्रवास
Punjab Kings performance In IPL : पंजाबच्या संघाला आतापर्यंत आयपीएलचा चषक उंचावता आलेला नाही. पंजाबसाठी सर्वात चांगला हंगाम 2014 चा राहिला आहे. 2014 मध्ये पंजाबने अंतिम फेरीत धडक मारली होती. पण फायनलमध्ये पंजाबला कोलकात्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता..त्यानंतर 2008 मध्ये प्लेऑफमध्ये पोहचला होता..गुणतालिकेत पंजाबचा संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहचला. इतर आयपीएल हंगामात पंजाबला प्लेऑपमध्ये पोहचता आले नाही. पंजाबने अनेकदा कर्णधार बदलले पण त्यांचं नशीब बदलले नाही...  

आयपीएलमध्ये पंजाब किंग्सची आतापर्यंतची कामगिरी -  
2008 - प्लेऑफ
2009- 5 व्या क्रमांकावर 
2010- 8व्या क्रमांकावर 
2011- 5व्या क्रमांकावर
2012- 6व्या क्रमांकावर
2013- 6व्या क्रमांकावर
2014-  उप विजेते
2015- 8व्या क्रमांकावर
2016- 8व्या क्रमांकावर
2017- 5व्या क्रमांकावर
2018- 7व्या क्रमांकावर
2019- 6व्या क्रमांकावर
2020- 6व्या क्रमांकावर
2021- 6व्या क्रमांकावर
2022- 6व्या क्रमांकावर

महत्त्वाच्या बातम्या

Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Bhagyashree : भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
Donald Trump : भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार?अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार? अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
Embed widget