PBKS Vs RR, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 52 व्या सामन्यात राजस्थानच्या संघानं पंजाबला पराभवाची धुळ चारली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्युत्तरात राजस्थानच्या संघानं 6 विकेट्स राखून पंजाबला पराभूत केलं. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालनं 68 धावांची वादळी खेळी केली. या सामन्यावेळी आणि सामन्यानंतर सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल झाले.. यातील मोजके दहा मिम्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय...
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, पंजाबच्या डावातील सहाव्या षटकात आर अश्विनच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेल बाद झाला. त्यानंतर बेअरस्टो आणि भानुका राजपक्षेनं संघाचा डाव सावरत पुढे नेला. मात्र, दहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर भानुका राजपक्षेनं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर मैदानात आलेल्या पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल स्वस्तात माघारी परतला. या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात होती. पण प्रसिद्ध कृष्णानं त्याला बाद करून पंजाबच्या संघाला मोठा धक्का दिला. दरम्यान, जितेश शर्मा आणि ऋषी धवननं संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. जितेश शर्मानं 18 चेंडूत 38 धावा तर, ऋषी धवननं 2 चेंडूत 5 धावा केल्या. पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. राजस्थानकडून युजवेंद्र चहलनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या आहेत. तर, प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विनला यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.
पंजाबनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरनं राजस्थानला संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 46 धावांची भागेदारी केली. परंतु, पंजाबच्या डावातील तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कागिसो रबाडानं जोस बटलरला जाळ्यात अडकवलं. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही स्वस्तात माघारी परतला. दरम्यान, यशस्वी जैस्वालनं संघाची एक बाजू संभाळत संघाचा डाव पुढे नेला. मात्र, अर्शदीपनं चौदाव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्याला झेल बाद केलं. त्यानं 41 चेंडूत 68 धावांची वादळी खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंह सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या आहेत. तर, कागिसो रबाडा आणि ऋषी धवन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.