IPL 2022 Marathi News : रोमांचक सामन्यात मुंबईने गुजरातचा पराभव केला. या सामन्यात गुजरातचा फलंदाज साई सुदर्शन हिट विकेट झाला. यंदाच्या हंगामात हिट विकेट होणारा साई सुदर्शन पहिला खेळाडू ठरला. पण आयपीएलच्या इतिहासात साई सुदर्शनच्या आधी 12 खेळाडू हिट विकेट झाले आहेत. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या रोमांचक सामन्यात मुंबईने गुजरातवर पाच धावांनी विजय मिळवलाय. अखेरच्या षटकात डॅनिअल सॅम्सने भेदक मारा करत सामना फिरवला. मुंबईने दिलेल्या 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 172 धावांपर्यंत मजल मारु शकला.  शुभमन गिल-वृद्धीमान साहा यांची वादळी अर्धशतकं गुजरातला विजय मिळवून देऊ शकली नाहीत. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील हा दुसरा विजय होय. 
 
मुंबईने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना गुजरातने आश्वासक सुरुवात केली होती. 16 व्या षटकात साई सुदर्षन दुर्दैवीपणे हिट विकेट बाद झाला. मुंबईकडून कायरन पोलार्ड षटक टाकत होता. अखेरच्या चेंडूवर साई सुदर्शनने मोठा फटका मारण्यासाठी बॅट फिरवली. स्वत:वरील नियंत्रण सुटल्यामुळे साई सुदर्शनची बॅट स्टंपला लागली अन् हिट विकेट झाला. यंदाच्या हंगामातील हा पहिला हिट विकेट होता. आयपीएलमध्ये हिट विकेट होणारा हा 13 खेळाडू ठरला.. 


IPL मध्ये हिट विकेट होणारे खेळाडू - 
मुसव्विर खोटे (मुंबई इंडियन्स), 2008- गोलंदाज: श्रीसंत
मिस्बाह उल हक (आरसीबी), 2008- गोलंदाज: श्रीसंत
स्वप्निल असनोदकर (राजस्थान रॉयल्स), 2009- गोलंदाज: एल्बी मोर्कल
रवींद्र जाडेजा (चेन्नई सुपर किंग्स), 2012- गोलंदाज: डेल स्टेन
सौरभ तिवारी (आरसीबी), 2012- गोलंदाज : हरभजन सिंह
युवराज सिंह (सनराइजर्स हैदराबाद), 2016- गोलंदाज: मिशेल मॅक्लेनाघन
दीपक हुड्डा (सनराइजर्स हैदराबाद), 2016- गोलंदाज: नाथन कूल्टर नाइल
डेविड वार्नर (सनराइजर्स हैदराबाद), 2016- गोलंदाज : अक्षर पटेल
शेल्डन जॅक्सन (कोलकाता नाइट राइडर्स), 2017- गोलंदाज: वॉशिंगटन सुंदर
रियान पराग (राजस्थान रॉयल्स), साल 2019- गोलंदाज: आंद्रे रसेल
हार्दिक पांड्या (मुंबई इंडियंस), 2020-गोलंदाज: आंद्रे रसेल
जॉनी बेयरस्टो (सनराइजर्स हैदराबाद), 2021- गोलंदाज: क्रुणाल पांड्या
साईं सुदर्शन (गुजरात टाइटन्स), 2022- गोलंदाज: कायरन पोलार्ड