IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (Punjab Kings Vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएल 2022 चा 52 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नावावर आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे. ज्यामुळं नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. पंजाब विरुद्ध  राजस्थानचा संघ त्यांचा अकरावा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान, या अकरा सामन्यात संजू सॅमसननं केवळ एकदाच नाणेफेक जिंकलं आहे. तर, दहावेळा नाणेफेक गमावलं आहे. विशेष म्हणजे,  संजू सॅमसननं जरी दहा वेळा नाणेफेक गमावलं असलं तरी आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात संजू सॅमसननं नेतृत्वात राजस्थानच्या संघानं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. राजस्थाननं दहा सामन्यांपैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत 12 गुणांसह राजस्थानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र,  नाणेफेकीच्या बाबतीत संजू सॅमसन इतका कमनशिबी कर्णधार कोणताच असू शकत नाही असं वाटतं. संजू सॅमसन आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 11 व्यांदा नाणेफेकीसाठी मैदानात आला. संजूनं 11 पैकी फक्त एकदाच नाणेफेक जिंकलं आहे. पंजाबविरूद्धच्या आज सुरू असलेल्या सामन्यातही त्यानं नाणेफेक गमावलं आहे.





मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर  (Wankhede Stadium) पंजाब किंग्ज आणि राजस्थान यांच्यात (Punjab Kings Vs Rajasthan Royals) आयपीएल 2022चा 52 सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पंजाबकडून जॉनी बेअरेस्टोनं (Jonny Bairstow) 40 चेंडूत 56 धावांची खेळी केली. 


हे देखील वाचा-