PBKS vs RR IPL 2024: राजस्थानचा पाचवा विजय, पंजाबची कडवी लढत, हेटमायरनं डाव पलटवला
Punjab Kings vs Rajasthan Royals IPL 2024: एम.वाय.सिंग मैदानावर हा सामना होणार आहे.
राजस्थाननं पाचवा विजय मिळवला असून पंजाबनं मात्र कडवी लढत दिली. अखेरच्या टप्प्यात हेटमायरनं 27 धावा करत डाव पलटवला.
राजस्थान रॉयल्सला विजयासाठी अखेरच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज आहे. 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर केशव महाराज आऊट झाला.
पंजाब किंग्जनं राजस्थानला पाचवा धक्का दिला आहे. ध्रुव जुरेल देखील बाद झाला आहे.
राजस्थानला चौथ धक्का बसला असून रियान पराग बाद झाला आहे. रियान परागनं 23 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सनं 16 व्य ओव्हरपर्यंत 3 बाद 105 धावा केल्या आहेत.
पंजाब किंग्जनं राजस्थानचे दोन्ही सलामीवीर बाद करण्यात यश मिळवलं आहे. यशस्वी जयस्वालनं 39 धावा केल्या.
पंजाब किंग्जनं दिलेलं 147 धावांचं आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थाननं सावध सुरुवात केली आहे. यशस्वी जयस्वाल आणि कोटिनयनं 50 धावांची सलामीची भागिदारी केली आहे.
पंजाब किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 बाद 147 धावा केल्या आहेत. राजस्थानला विजयासाठी 148 धावांची गरज आहे.
पंजाब किंग्जनं 16 व्या ओव्हरमध्ये 100 धावांचा टप्पा पार केला आहे. जितेश शर्मा आणि लियोम लिविंगस्टननं आक्रमक फलंदाजी सुरु केली आहे.
पंजाबसाठी गेल्या दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी करणारा शशांक सिंग आज चांगली कामगिरी करु शकला नाही. तो 9 धावांवर बाद झाला.
पंजाबची खराब कामगिरी सुरुच असल्याचं चित्र आहे. कॅप्टन सॅम करन 6 धावा करुन बाद झाला.
पंजाब किंग्जच्या धावसंख्येला राजस्थान रॉयल्सच्या बॉलर्सनी ब्रेक लावला आहे. पहिल्या 9 ओव्हर्समध्ये पंजाबच्या 3 बाद 50 धावा झाल्या आहेत.
पंजाबला दुसरा धक्का बसला असून प्रभासिमरन सिंग 10 धावा करुन बाद झाला आहे.
पंजाब किंग्जला पहिला धक्का बसला असून सलामीवर अथर्व तायडे 15 धावा करुन बाद झाला आहे.
जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन सिंह, सॅम करन (कॅप्टन), लियम लिविंग्सटन, जितेश शर्मा (विकेट कीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा
संजू सॅमसन (कॅप्टन विकेटकीपर), रियान पराग, शिमरन हेडमायर, ध्रुवर जुरेल, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, ट्रेंट बोल्ट, केशव महाराज, आवेश खान, कुलदीप सेन, युजवेंद्र चहल
राजस्थाननं टॉस जिंकला असून संजू सॅमसननं पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला.
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात थोड्याच वेळात टॉस होणार आहे. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवण्याचा राजस्थानचा प्रयत्न असेल. तर, पंजाबला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी विजय आवश्यक आहे.
पंजाब किंग्च्या गोलंदाजांनी यापूर्वी अधिक धावा दिल्या आहेत. त्यामुळं त्यांना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या चार मॅचमध्ये विजय मिळाला होता. त्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्ध त्यांचा पराभव झाला. हा पराभव विसरुन राजस्थानला आज मैदानात उतरावं लागणार आहे.
आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स 26 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये राजस्थानने 15 सामने जिंकले, तर पंजाबने 11 सामने जिंकले आहेत.
पंजाब आणि राजस्थान यांच्यातील हा सामना महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड येथे खेळवला जाईल. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य आहे. तसेच, दुसऱ्या डावात येथे फलंदाजी करणे आणखी सोपे होते. या मैदानावर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांनाही नवीन चेंडूद्वारे मदत मिळते. या हंगामात येथे दोन सामने झाले आहेत, ज्यामध्ये वेगवान गोलंदाजांनी 23 विकेट्स घेतले आहेत.
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रबसिमरन सिंग, सॅम कुरान, सिकंदर रझा/लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा
पार्श्वभूमी
Punjab Kings vs Rajasthan Royals IPL 2024: आयपीएल 2024 च्या हंगामात आज पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना रंगणार आहे. एम.वाय.सिंग मैदानावर हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता सामना सुरु होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -