IPL 2023, Orange and Purple Cap :  आयपीएलचा सोळावा हंगाम उत्तारार्धाकडे जसा जसा झुकत आहे, तसा तसा अधिक रंजक होत आहे. प्रत्येक संघ प्लेऑफच्या शर्यतीत असून सामने रंगतदार होत आहे. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठी गोलंदाज आणि फलंदाजामध्ये रंगतदार लढत पाहायला मिळत आहे. ऑरेंज कॅप सध्या आरसीबीकडे आहे.. तर पर्पल कॅपवर गुजरातच्या संघाने कब्जा मिळवलाय. या स्पर्धेत कोण कोण आहे... पाहूयात... 


ऑरेंज कॅप स्पर्धेत कोण कोणते खेळाडू -


ऑरेंज कॅप स्पर्धेत आरसीबीच्या फाफ डु प्लेसिस याने सध्या बाजी मारली आहे. फाफ डु प्लेलिस याने नऊ सामन्यात पाच अर्धशतकाच्या बळावर 466 धावांचा पाऊस पाडलाय. फाफ याने 59 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. पण फाफला युवा यशस्वी जयस्वाल याच्याकडून कडवी टक्कर मिळत आहे. यशस्वी जयस्वाल याने नऊ सामन्यात तीन अर्धशतकाच्या मदतीने 428 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल याने 28 षटकात आणि 56 चौकार लगावले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर चेन्नईचा डेवेन कॉनवे आहे. कॉनवेने 10 सामन्यातील 9 डावात 414 धावा केल्या आहे. यादरम्यान कॉनवे याने पाच अर्धशतके झळकावली आहेत. चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. कोहलीने पाच अर्धशतकाच्या मदतीने आणि 45 च्या सरासरीने 364 धावा चोपल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड आहे. त्याने दहा सामन्यातीन नऊ डावात दोन अर्धशतकाच्या मदतीने 354 धावा केल्या आहेत. सहाव्या क्रमांकावर शुभमन गिल आहे, त्याने नऊ सामन्यात 339 धावा केल्या आहेत. 


पर्पल कॅपसाठी भारतीय गोलंदाजामध्ये चढाओढ - 


पर्पल कॅपसाठी भारतीय गोलंदाजांमध्ये चुरस पाहायाला मिळत आहे. मोहम्मद शमी आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 17 विकेट घेतल्या आहेत. पण मोहम्मद शमी याने धावाही रोखल्या आहेत. त्यामुळे पर्पल कॅप मोहम्मद शमीच्या डोक्यावर आहे. शमीने नऊ सामन्यात 17 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. चेन्नईच्या तुषार देशपांडे याने 10 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पंजाबचा अर्शदीप आहे. त्यानेल 10 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. मुंबईच्या पीयूष चावलाने मोठी झेप गेत चौथे स्थान पटकावले आहे. चावलाने 9 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद सिराज आणि राशिद कान यांनीही 15 विकेट घेतल्या आहेत. ते अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. रविंद्र जाडेजा 14 विकेटसह सातव्या स्थानावर आहे तर अश्विन 13 विकेटसह आठव्या क्रमांकावर आहे.


गुणतालिकेत आघाडीचे चार संघ कोणते?


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजरातने नऊ सामन्यात सहा विजय मिळवले आहेत. 12 गुणांसह ते पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत. गुजरातने आतापर्यंत फक्त तीन सामने गमावले आहेत. आज एका गुणाची कमाई करत लखनौच्या संघाने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. लखनौचे 10 सामन्यात 11 गुण झाले आहेत. चेन्नईचेही 10 सामन्यात 11 गुण आहेत. पण लखनौचा नेट रनरेट चेन्नईपेक्षा सरस असल्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेय. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघ चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 9 सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. तर चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.