मुंबई : मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएलच्या 2024 च्या (IPL 2024) हंगामात अनेक गोष्टी निराशाजनक ठरल्या. हार्दिक पांड्यांच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सला केवळ चार मॅचमध्ये विजय मिळवता आला. मुंबईला आयपीएलमध्ये 10 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) विरुद्धच्या अखेरच्या मॅचमध्ये देखील मुंबईला विजय मिळवून चांगला शेवट करता आला नाही. मुंबईनं यंदा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी कर्णधार देखील बदलला होता. मात्र, मुंबईला त्यामध्ये यश आलं नाही. लखनौ विरुद्धच्या मॅचनंतर मुंबई इंडियन्सच्या संघमालक नीता अंबानी (Nita Ambani) यांनी सर्व खेळाडूंसोबत संवाद साधला. आपल्यासाठी हा सीझन निराशाजनक ठरला,आपण मागं जाऊ आढावा घेऊ, त्याचा विचार करु असं नीता अंबानी म्हणाल्या. यावेळी नीता अंबानी यांनी टी-20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या भारताच्या खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या.
नीता अंबानी काय म्हणाल्या?
आपल्यासाठी हा सीझन निराशाजनक ठरल्या, आपण अपेक्षित केल्याप्रमाणं घटना घडल्या नाहीत. मी अजूनही मुंबई इंडियन्सची मोठी फॅन आहे. संघ मालक म्हणून पण मुंबई इंडियन्सची जर्सी घालणं अभिमानास्पद आहे, असं नीता अंबानी यांनी म्हटलंय. आपण मागं जाऊ, आढावा घेऊ आणि विचार करु, असंही त्यांनी म्हटलं. मुंबई इंडियन्सच्या संघातील जे खेळाडू त्यांच्या देशाकडून टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहेत, त्या सर्व खेळाडूंना नीता अंबानी यांनी शुभेच्छा दिल्या.
नीता अंबानी यावेळी विशेषत: रोहित शर्मा , हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा विशेष उल्लेख केला. सर्व भारतीय तुम्हाला प्रोत्साहन देत आहेत. तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट असं नीता अंबानी यांनी म्हटल आहे.
पाहा व्हिडीओ :
नीता अंबानी यांनी रोहित शर्माला लखनौ विरुद्ध केलेल्या 68 धावांच्या खेळीसाठी विशेष पदक देऊन सन्मानित केलं.
मुंबई इंडियन्सला होमग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या आयपीएलमध्ये दहाव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
मुंबई इंडियन्सनं 2020 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतरच्या चार आयपीएलमध्ये दोनदा मुंबईचा संघ दहाव्या स्थानी राहिला आहे. पुढील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कमबॅक करणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय.
संबंधित बातम्या :
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली