बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं(Royal Challengers Bengaluru)  चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) 27 धावांनी पराभूत केलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला गुणतालिकेत दहाव्या स्थानावर असलेल्या आरसीबीनं सलग सहा मॅच जिंकत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं.  प्लेऑफमध्ये स्थान मिळाल्याचा आनंद व्यक्त करत असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खेळाडूंकडून धोनीचा अपमान झाल्याचा दावा करण्यात येतोय. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि चेन्नईचे खेळाडू आरसीबीच्या खेळाडूंसोबत हस्तोंदलन करण्यासाठी थांबले होते. मात्र, आरसीबीचे खेळाडू जल्लोष करत असल्यानं धोनीनं आरसीबीच्या सपोर्ट स्टाफला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आणि तो निघून गेला. या प्रकरणावरुन इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉननं आरसीबीच्या खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. 


महेंद्रसिंह धोनीसोबत हस्तोंदलन न केल्यानं आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर टीका केली जातेय. गतविजेत्या चेन्नईनं 201 धावा केल्या असत्या तर त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळाला असता. मात्र, चेन्नईनं 7 विकेटवर 191 धावा केल्या. यानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी जंगी सेलिब्रेशन केलं. धोनी आणि चेन्नईचे खेळाडू थोडावेळ आरसीबीच्या खेळाडूंसोबत हस्तोंदलन करण्यासाठी थांबले. मात्र, आरसीबीचे खेळाडू न आल्यानं धोनीनं आरसीबीच्या सपोर्ट स्टाफला विजयाच्या शुभेच्छा दिल्या.  या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  



पाहा व्हिडीओ :







मायकल वॉन यानं मी आरसीबीच्या खेळाडूंचं वर्तन समजू शकतो. पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी आणि आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी आतूर झालेले असतील. आरसीबीचे अनेक सपोर्टर आहेत मात्र या टीमवर रागावणारे देखील अनेक लोक आहेत, असं म्हटलं. 


हर्षा भोगले यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करताना म्हटलं की, मी या घटनेचे फोटो पाहिलेले नाहीत. मात्र, तुम्ही वर्ल्ड कप जिंकला तरी तुमच्या भावना बाजूला ठेवून तुम्ही हस्तोंदलन केलं पाहिजे. हाच आपल्या खेळाचा महत्त्वाचा भाग आहे, असं हर्षा भोगले म्हणाले. मायकल वॉन आणि हर्षा भोगले क्रिकबझच्या कार्यक्रमात बोलत होते. 


मायकल वॉन यांनी आरसीबीच्या खेळाडूंनी महेंद्रसिंह धोनी सारख्या महान खेळाडूशी हस्तोंदलन करण्याची सभ्यता दाखवायला हवी होती, असं म्हटलं. ती वेळ तुमची खेळाबद्दलची सतर्कता दाखवण्याची होती. आरसीबीचे खेळाडू आनंद व्यक्त करण्यात व्यस्त असतील मात्र त्यांनी धोनीसोबत हस्तोंदलन करायला हवं होतं, असं वॉननं म्हटलं. आरसीबीच्या खेळाडूंच्या महेंद्रसिंह धोनीनं आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्यास त्याच्याशी हस्तोंदलन मुकलो, अशी भावना राहील, तसं घडायला नको होतं, असं वॉन यानं म्हटलं.   


संबंधित बातम्या :


Rinku Singh: रिंकू सिंगनं ज्याला पाच सिक्स मारलेले त्याच यश दयाळसाठी खास स्टोरी, आरसीबीच्या विजयानंतर म्हणाला....  


Faf Du Plessis : धोनी मैदानावर असेपर्यंत मॅच वाचवणं अवघड होतं.. फाफ डु प्लेसिसची कबुली, म्हणाला....