IPL 2022 : जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलचा डंका आता अमेरिकेपर्यंत पोहचला आहे. अमेरिकेतील फुटबॉल (NFL) दिग्गज लॅरी फिट्जगेराल्ड आणि दोन वेळाचा ऑलम्पिक गोल्ड मेडलिस्ट बास्केटबॉल खेळाडू ख्रिस पॉल यांनी आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघात गुंतवणूक केली आहे. या दोघांसोबत एनएफएल स्टार केल्विन बीचम यानेही आयपीएल फ्रेंचाइजीमध्ये अल्पांश गुंतवणूक केली आहे. राजस्थान रॉयल्सचे सर्व हक्क मनोज बडाले यांच्याद्वारे नियंत्रित इमर्जिंग मीडिया व्हेंचर्सकडे आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामात बीसीसीआयने आयपीएल संघाची संख्या  वाढवली. यंदापासून लखनौ आणि गुजरात या दोन संघाचा समावेश केला. त्यामुळे बीसीसीआयच्या कमाईतही वाढ झाली आहे. 


 ख्रिस पॉल, लॅरी फिट्जगेराल्ड आणि केल्विन बीचम यांनी आमच्या संघात गुंतवणूक केली आहे, अशी माहिती राजस्थान रॉयल्सने दिली आहे. त्यांनी ही गुंतवणूक इमर्जिंग मीडिया व्हेंचर्सच्या माध्यमातून केली. याचं सर्व नियंत्रण मनोज बडाले यांच्याकडे आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे लॅरी फिट्सजेगोराल्ड यांनी सांगितेलय. भारतात खेळाडू संस्कृती आहे. भारतामध्ये क्रिकेटला अधिक पसंती दर्शवली जाते. येथील लोक क्रिकेटप्रेमी आहेत, असे फिट्सजेगोराल्ड म्हणाले. 
 
आयपीएलच्या 15 व्या हंगामात राजस्तान रॉयल्सने दमदार कामगिरी केली आहे. गुणतालिकेत राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. पर्पल आणि ऑरेंज कॅप राजस्थान संघाच्या खेळाडूंकडेच आहे. राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये शर्यतीत आघाडीवर आहे. लवकर प्लेऑफमधील आपली जागा पक्की करेल. 


दरम्यान, मागील पंधरा वर्षांपासून आयपीएल जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. आयपीएलमध्ये जगातील सर्वच देशांमधून क्रिकेटर आपले नशीब अजमावण्यास येतात. आयपीएलमधील कोलकाता संघाने कॅरेबिअन प्रिमिअर लीगमध्येही गुंतवणूक केली आहे. त्रिनबागो नाइट राइडर्स नावाचा संघ विकात घेतला आहे. या संघाने तेथे तीन वेळा चषकावर नाव कोरलेय. त्याशइवाय यूएईमध्ये सुरु होणाऱ्या लीगमध्येही अनेक आयपीएल संघांनी गुंतवणूक केली आहे.