DC vs LSG : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 45 वा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट्स (DC vs KKR) या दोन संघात पार पडत आहे. लखनौने नुकतीच नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा करण्याच निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये जवळपास सर्वच संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. फक्त गुजरातने आतापर्यंत प्रथम फलंदाजी घेतली होती. मात्र आता लखनौनेही निर्णय़ घेतला आहे. सामना दुपारच्या सुमारास असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये दवाची अडचण अधिक येणार नाही, असा विचार करत राहुलने हा निर्णय घेतला असावा.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता लखनौ सुपरजायंट्सने त्यांच्या संघात एक बदल केला असून वेगवान गोलंदाज आवेश खानला विश्रांती देत अष्टपैलू कृष्णपा गौथम याला संधी दिली आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने संघात कोणताही बदल केलेला नाहीत. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...
दिल्ली अंतिम 11
पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया
लखनौ अंतिम 11
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, कुणाल पांड्या, मार्कस स्टोयनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, मोहसिन खान, कृष्णपा गौथम, रवी बिश्नोई
हे ही वाचा -
- DC vs LSG : खलीलच्या दुखापतीने पंतची चिंता वाढवली, लखनौ-दिल्लीची अशी असेल प्लेईंग 11
- पंचाच्या निर्णानंतर चहल नाराज, फलंदाजी करणाऱ्या सूर्याने काढली समजूत, पाहा व्हिडीओ
- IPL 2022 : आठ पराभवानंतर पहिला विजय, बर्थ-डे बॉय रोहित शर्मा म्हणाला....
- Top 10 Key Points : मुंबईचा 'रॉयल' विजय , सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर