Most No Ball In IPL History : आयपीएलचा रनसंग्राम सुरु होऊन तब्बल पंधरा वर्ष उलटली आहे. 2008 मध्ये आयपीएलचा महासंग्राम सुरु झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या स्पर्धेने संपूर्ण जगाला याड लावलेय. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून आयपीएलला ओळखले जाते. या स्पर्धेत अनेक विक्रम झाले आहेत. अनेकांनी मोठंमोठे विक्रम केले आहेत. तर काहींच्या नावावर नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे. आजही आपण अशाच नकोशा विक्रमाची माहितीबद्दल जाणून घेणार आहोत. आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक नो बॉल कोणत्या गोलंदाजाने फेकले? तुम्हाला माहितेय का? जाणून घेऊय़ात आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल फेकणाऱ्या पाच गोलंदाजाबद्दल....


लसिथ मलिंगा - 
मुंबई इंडियन्स (MI) संघाचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल फेकण्याऱ्या गोलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.  मलिंगाने 122 आयपीएल सामन्यात  18 नो बॉल फेकले आहेत. मलिंगाने आयपीएलमध्ये  170 विकेट घेतल्या आहेत.  


इशांत शर्मा/अमित मिश्रा
इशांत शर्माने आयपीएलमध्ये 93 सामने खेळले आहेत. इशांत शर्माने 72 विकेट घेतल्या आहेत. इशांत शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. इशांत शर्माने   21 नो बॉल फेकले आहेत. सर्वाधिक नो बॉल फेकणाऱ्या गोलंदाजांमध्ये इशांत शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. याच क्रमांकावर फिरकीपटू अमित मिश्राही आहे. अमित मिश्राने 154 आयपीएल सामन्यात 21 नो बॉल टाकलेत.  


उमेश यादव/एस. श्रीसंत
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने आयपीएलच्या 123 सामन्यात 23 नो बॉल टाकले आहे. उमेश यादवने आतापर्यंत आयपीएल 133 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल फेकणाऱ्यामध्ये उमेश यादवचाही क्रमांक लागतो. श्रीसंतनेही कमी सामन्यात जास्त नो बॉल फेकले आहेत.  एस. श्रीसंतने 44 आयपीएल सामन्यात 23 नो बॉल फेकेले आहेत.  


जसप्रीत बुमराह
मुंबई इंडियन्सचा (MI) वेगवॉन गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल फेकले आहेत.  बुमराहने आतापर्यंत 114 आयपीएल सामन्यात तब्बल 27 नो बॉल फेकले आहेत. बुमराहने 135 विकेटही घेतल्या आहेत.